घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : सोमवार 5 फेब्रुवारी 2024

राशीभविष्य : सोमवार 5 फेब्रुवारी 2024

Subscribe

मेष – तुमचे वर्चस्व वाढेल. विरोधक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. मैत्रीमुळे समस्येतून मार्ग निघेल.

वृषभ – आजच महत्त्वाचे काम करून घ्या. कठीण समस्या चांगल्या व्यक्तीच्या मदतीने सोडवू शकाल. कलेत मन रमेल.

- Advertisement -

मिथुन – वरिष्ठांच्या मतानुसार काम करावे लागेल. कामाचा व्याप वाढेल. दगदग होईल. धंद्यात नवे काम मिळेल.

कर्क – नोकरीत काम करताना एकाग्रता ठेवा. आजचे काम उद्यावर टाकू नका. प्रेमाला चालना मिळेल. पैशांची वसुली करा.

- Advertisement -

सिंह – प्रवासात घाई करू नका. वाहन हळू चालवा. तडजोड करण्याची वेळ येऊ शकते. रागावर ताबा ठेवा.

कन्या – मुलांची प्रगती होईल. घरात शुभ समाचार मिळेल. आजचे काम आजच करून घ्या. धंद्यात यश मिळेल.

तूळ – काम करताना मन एकत्र करा. कामातील चुकांवर लक्ष द्या. शेजार्‍याला संकटात मदत करावी लागेल. स्नेह वाढेल.

वृश्चिक – अडचणीतून मार्ग काढणारा माणूसच प्रगती करू शकतो. नम्रता ठेवा. नवीन ओळख होईल. कोर्टकेस सुटेल.

धनु – धंद्यात प्रगतीकारक घटना घडेल. गोड बोलण्यावर जास्त भाळून जाऊ नका. प्रसिद्धी मिळेल. घर खरेदी कराल.

मकर – विचारांना दिशा मिळेल. तुमचा उपयोग झाल्याने मित्रपक्ष तुमचे कौतुक करतील. नवे मित्र जोडले जातील.

कुंभ – मनावर दडपण येईल. तुमचा विचार सर्वांना पटणे कठीण आहे. विचारांवर ठाम राहा. प्रवासात घाई करू नका.

मीन – आजच्या कामात चांगले यश मिळेल. आळस करू नका. धंद्यात फायदा होईल. नवे काम मिळेल. तब्येत सांभाळा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -