घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य: सोमवार, ०१ मार्च २०२१

राशीभविष्य: सोमवार, ०१ मार्च २०२१

Subscribe

मेष : धंद्यात फायदेशिर योजना शोधता येईल. मैत्री वाढेल. राजकीय-सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. नोकरी मिळेल.

वृषभ : प्रयत्नाने तुम्ही तुमची कामे करण्यात यश मिळवू शकाल. घरातील वाद, नाराजी जास्त वाढू देऊ नका. व्यसन नको.

- Advertisement -

मिथुन : मनावर दडपण येईल. नोकरीत काम वाढेल. पण तुमची प्रतिमा सतेज राहिल. स्पर्धेत कष्ट द्या.

कर्क : जास्त महत्वाचे काम आज करा. भेट घेता येईल. कोर्टाच्या कामात सुधारणा होईल. नम्रपणे तुमचे मत मांडा.

- Advertisement -

सिंह : नवीन थोरा-मोठ्या व्यक्तींचा सहवास मिळेल. लाभ होईल. जुने येणे वसुल करा. ऐशो आरामात रहाल. प्रतिष्ठा मिळेल.

कन्या : नोकरीत वरिष्ठांच्या विचारांचा आदर करावाच लागेल. नातलगांच्या बरोबर प्रेमाने वागा. स्वतःची काळजी घ्या.

तूळ : धावपळ दगदग होईल. नवीन ओळखी होतील. कला क्षेत्रात प्रगतीची मोठी संधी मिळेल. प्रवासात घाई नको.

वृश्चिक : खर्च वाढेल. मैत्रीत फसगत होईल. उधार पैसे देऊ नका. राजकीय क्षेत्रात सर्वांच्या मतांचा आदर केल्यानेच प्रश्न सुटेल.

धनु : किरकोळ अडथळे येतील. रस्ता जपून ओलंडा. दुखापत होऊ शकते. जमिन, घर यासंबंधी अडचण वाढेल.

मकर : आजचे काम उद्यावर टाकू नका. ओळखीमुळे अडलेले काम होईल. कोर्टाच्या कामात यश मिळवाल.

कुंभ : अपेक्षित व्यक्तीची भेट घेण्यास छोटीशी समस्या येईल. जुना वाद शेजारी निर्माण करू शकतो. वस्तू सांभाळा.

मीन : वरिष्ठ तुमच्या कडे जबाबदारी देतील कठीण काम करून दाखवाल. नम्रता ठेवा. गोड बाला मदत मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -