राशीभविष्य: सोमवार १३ मार्च २०२३

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष ः- घरातील व्यक्तींचा सल्ला उपयोगी पडेल. प्रेमाची माणसे मदत करतील. प्रतिष्ठा मिळेल.

वृषभ ः- वादविवाद वाढू देऊ नका. प्रवासात सावध रहा. वाहनाचा वेग कमी ठेवा. रागावर ताबा ठेवा.

मिथुन ः- तुमचा प्रश्न वरिष्ठ सोडवतील. जुने मित्र मदत मागण्यास येतील. स्पर्धेत जिंकाल.

कर्क ः- तुमची प्रतिमा डागळण्याचा प्रयत्न होईल. राग वाढू देऊ नका. प्रवासात सावध रहा. गोड बोलून कामे करा.

सिंह ः- तुमच्या विचारांना सर्वांची सहमती मिळेल. तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. मित्र मदत करतील.

कन्या ः- घर, जमीन घेण्याचा विचार पूर्ण करता येईल. शोध घ्या. धंद्यात फायदा होईल.

तूळ ः- कल्पनाशक्तीला चालना मिळेल. नवीन ओळख होईल. कला-क्रीडा-साहित्यात प्रगती होईल.

वृश्चिक ः- अधिकाराची भाषा कुठेही करू नका. नम्रपणे तुमचा मुद्दा मांडा तरच तुमचा प्रभाव राहील.

धनु ः- कठीण काम करून घ्या. प्रतिष्ठा मिळेल. मदत करणार्यांना दुखवू नका. फायदा करून घ्या.

मकर ः- तुमच्यावर काही लोक निष्कारण रोष ठेवतील. घरातील लोकांचे सहकार्य मिळेल. धंद्यात लक्ष द्या.

कुंभ ः- दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. घरात शुभ कार्याचे ठरेल. परीक्षेत चांगली प्रगती करता येईल.

मीन ः- धावपळ जास्त होईल. रस्त्याने सावधपणे चाला. महत्त्वाची कागदपत्र सांभाळा.