राशीभविष्य : सोमवार १० मे, २०२१

Horoscope
राशीभविष्य

मेष ः- पूर्व ग्रह दुषितांचा गैरसमज वेळच्या वेळी दूर करा. नवीन ओळख होईल. धंदा मिळेल.

वृषभ ः- वरिष्ठांची मानसिकता पाहून तुम्ही तुमचे काम त्यांना सांगा. धंद्यात लक्ष ठेवा. मौज-मजा कराल.

मिथुन ः- महत्त्वाचे काम करण्यात यश मिळेल. चर्चा करता येईल. धंद्यात फायदा होईल.

कर्क ः- मनाची द्विधा अवस्था होईल. धंद्यातील तणाव व समस्या कमी करू शकाल. मैत्री वाढेल.

सिंह ः- क्षुल्लक कारणाने गैरसमज होईल. रस्त्याने चालताना विचार करत चालू नका. सावध रहा.

कन्या ः- घरातील समस्या कमी करू शकाल. नोकरीत जवळच्या लोकांना मदत करावी लागेल. खर्च वाढेल.

तूळ ः- जीवनसाथीच्या प्रगतीची खबर मिळेल. नातलग भेटतील. समारंभात हजर रहाल. धंदा वाढेल.

वृश्चिक ः- प्रवासाचा बेत ठरवाल. धंद्यात धाडसी निर्णय घेण्याचे ठरवाल. कलाक्षेत्रात ओळख वाढेल.

धनु ः- मुले, नातवंडे यांची भेट घडेल. महत्त्वाचा फोन येईल. घराची शोध मोहीम पूर्ण कराल.

मकर ः- घरातील व्यक्तींना खूश कराल. सहलीचा आनंद घ्याल. तुमच्या कामातील अडचणी दूर होतील.

कुंभ ः- मुलांच्या बरोबर चर्चा करताना वादाकडे विषय जाण्याची शक्यता आहे. क्षुल्लक अडचणी प्रवासात येतील.

मीन ः- महत्त्वाचे काम आजच करून घ्या. धंद्यात वाढ होईल. फायदा वाढेल. नवीन ओळख होईल.