राशीभविष्य: सोमवार, ११ ऑक्टोबर २०२१

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष :- जीवनसाथीची मर्जी राखता येईल. आज ठरविलेले काम उद्यावर टाकू नका. चर्चा करण्यात उत्साह राहील.

वृषभ :- घरात मनाविरुद्ध काम करावे लागेल. नको असलेल्या व्यक्तीची भेट होईल. अचानक खर्च निर्माण होईल.

मिथुन :- धंद्यात काम मिळेल असा प्रयत्न करा. मित्राची मदत घेता येईल. थकबाकी मिळवा. आळस करू नका.

कर्क :- किरकोळ वाद वाढवू नका. थट्टा-मस्करी करण्यात वेळ मजेत जाईल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.

सिंह :- नव्या विषयाचा अभ्यास करता येईल. कला क्षेत्रात मन रमेल. राहून गेलेले काम करून घ्या. पाहुणे येतील.

कन्या :- विचारांना चालना मिळेल. ठरविलेली योजना पूर्ण करता येईल. जीवनाला कलाटणी देणारी घटना घडेल.

तूळ :- नियोजनबद्ध कार्यक्रम करता येईल. वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. कल्पनाशक्ति वाढेल. मौज-मजा कराल.

वृश्चिक :- मनावर दडपण येईल. खर्च वाढेल. वेळ प्रसंग पाहून तुम्हाला निर्णय बदलावा लागेल. वाद वाढवू नका.

धनु :- महत्वाच्या प्रश्नावर चर्चा करता येईल. सहकार्य मिळेल. तुमचा उत्साह वाढेल. धंद्ात चांगली बातमी मिळेल.

मकर :- जुन्या चुका सुधारून नव्याने प्रगतीचा मार्ग घेता येईल. कोर्टाच्या कामात सरशी होईल. मोठे काम मिळेल.

कुंभ :- कर्जाचे काम करून घेता येईल. कल्पना सुचेल. आवडत्या व्यक्तीचा सहवास मिळेल. मोठी खरेदी कराल.

मीन :- मनावर एखाद्या विषयाचे दडपण राहील. अनोळखी माणसाच्या बरोबर सावधपणे वागा. फसगत होईल.