मेष – व्यवसाय विस्तारासाठी योजना आखाल. स्वभावात चिडचिड होऊ शकते. नवीन ज्ञान आणि अनुभव मिळेल.
वृषभ – कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील.
मिथुन – भौतिक गोष्टींकडे कल वाढेल. नोकरी-व्यवसायात सहकार्यांची भागीदारी व सहकार्य पुरेशा प्रमाणात मिळेल.
कर्क – जुनी गुंतवणूक फायदेशीर राहील. नोकरीत उच्च पद मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल.
सिंह – मित्रांच्या मदतीने व्यवसायाचे नवे स्रोत निर्माण होतील. खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. उत्पन्न वाढेल.
कन्या – कुटुंबात प्रेम व उत्साहाचे वातावरण असेल. मुलांच्या आनंदात वाढ होईल. घरातील वृद्ध व्यक्तींची काळजी घ्या.
तुळ – काही अनियोजित खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. नोकरीत अधिकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल.
वृश्चिक – जोडीदाराचा सल्ला उपयुक्त ठरेल. नातेसंबंधदेखील मजबूत होतील. कार्यक्षेत्रात मेहनत करावी लागेल.
धनु – पैशांची आवक झाल्यामुळे मनोबल वाढेल. अधिकार्यांकडून प्रशंसा होईल. महत्त्वाच्या कामात बदल होईल.
मकर – सामाजिक कार्यात सहभागी झाल्यास आदर आणि प्रसिद्धी वाढेल. विरोधक तुमच्या कामाची प्रशंसा करतील.
कुंभ – नियोजित पद्धतीने केलेल्या कामात हमखास यश मिळेल. धार्मिक कार्यक्रमात आपला सहभाग असू शकतो.
मीन – मालमत्ता किंवा व्यवसायात गुंतवणूक करायची असेल तर ती आत्मविश्वासाने करा. भविष्यात फायदा होईल.
Horoscope : शनिवार 1 मार्च 2025
written By My Mahanagar Team
Mumbai

संबंधित लेख