घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य: शनिवार ०४ फेब्रुवारी २०२३

राशीभविष्य: शनिवार ०४ फेब्रुवारी २०२३

Subscribe

मेष ः- जीवनाला दिशा देणारा विचार जवळचे लोक देतील. आत्मविश्वास कायम ठेवा. धंद्यात आळस करू नका.

वृषभ ः- तुमचा प्रभाव सर्वत्र वाढेल. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. नोकरीत वरिष्ठांची मदत उपयोगी पडेल.

- Advertisement -

मिथुन ः- खचून जाऊ नका. रागावर ताबा ठेवा. खाण्याचे तंत्र सांभाळा. वरिष्ठांचा विचार ऐकून घ्या.

कर्क ः- आज ठरविलेल्या भेटीत व चर्चेत यश मिळेल. तुमचा प्रभाव दिसून येईल. कल्पनाशक्ती वाढेल.

- Advertisement -

सिंह ः- शत्रूला वश करण्यात यश मिळेल. नवा परिचय उत्साहवर्धक ठरेल. कोर्टाचे काम होईल.

कन्या ः- धंद्यात हलगर्जीपणा करू नका. फायदा होईल. जवळच्या व्यक्तींचा विचार ऐकून घ्या. दिशा मिळेल.

तूळ ः- दडपणाखाली रहाल. अचानक कुणीतरी तुम्हाला दुखावण्याची शक्यता आहे. नम्रपणा सोडू नका.

वृश्चिक ः- आजचे काम उद्यावर टाकू नका. मित्र मदत करतीलच असे गृहीत धरू नका. सहाय्य मात्र मिळेल.

धनु ः- कामाचा व्याप वाढेल. तुमच्यावर टीका केली जाईल. क्षुल्लक कारणाने वाद वाढू शकतो.

मकर ः- दुसर्‍यांचे विचार ऐकून घ्या. त्यातूनच तुम्हाला नवा मार्ग सापडेल. गुप्त कारवायांना रोखता येईल.

कुंभ ः- तुम्ही घेतलेले श्रम सत्कारणी लागतील. तुमच्या कामाचा मोबदला अथवा श्रेय मिळेलच असे नाही.

मीन ः- वर्चस्व वाढेल. धंद्यात सुधारणा होईल. कामगार चांगले काम करतील. आनंदी रहाल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -