राशीभविष्य: शनिवार ०४ मार्च २०२३

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष ः- दुसर्‍यांचे विचार ऐकून घ्या. घाईत प्रश्न सुटणार नाही. तुम्ही थोडा काळ तटस्थ रहा. मार्ग मिळेल.

वृषभ ः- कठीण काम करा. धंद्यात मोठे काम मिळेल. मौज मजेत वेळ जाईल. नातलग भेटतील.

मिथुन ः- फायदेशीर घटना घडेल. नवीन ओळख वाढेल. स्पर्धेत जिंकाल. चांगली बातमी मिळेल.

कर्क ः- अपमानाकडे दुर्लक्ष करा. कार्य करा. लोकांच्या उपयोगी पडा. मार्ग शोधता येईल.

सिंह ः- मनावर दडपण येईल. मोठे लोक आश्वासन देतील. काम करून घेणे कठीण पडेल. धंदा मिळवा.

कन्या ः- आजचे काम उद्यासाठी ठेवू नका. चर्चा सफल होईल. तुमचे डावपेच बरोबर उपयोगी येतील.

तूळ ः- खाण्याची चैन कमीच करा. प्रतिष्ठा मिळेल. कुणालाही कमी लेखू नका. गोड बोला.

वृश्चिक ः- तुमची कामे पटापट करून घ्या. मौज-मजेत वेळ जाईल. आवडते पदार्थ मिळतील.

धनु ः- धावपळ होईल. मैत्रीत दुरावा येऊ शकतो. शेजारी तणाव निर्माण करण्याची शक्यता आहे.

मकर ः- घरातील व्यक्ती मदत करतील. तुम्ही तटस्थ रहा. वाटाघाटीत यश मिळेल. वाहन जपून चालवा.

कुंभ ः- तुमच्या मनाला त्रास देणारी घटना घडेल. घरातील व्यक्ती स्वतंत्रपणे वागेल.धंद्यात यश मिळेल.

मीन ः- उद्याचे काम आजच करा. फायदा होईल. पद मिळेल. थकबाकी मिळवा. प्रेमाला चालना मिळेल.