Maharashtra Assembly Election 2024
घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शनिवार ०६ एप्रिल २०२४

राशीभविष्य : शनिवार ०६ एप्रिल २०२४

Subscribe

मेष – किरकोळ अडथळे आले तरी काम पूर्ण होईल. आर्थिक देवघेवीत काळजी घ्या. आप्तेष्ठांसाठी वेळ खर्च करावा लागेल.
वृषभ – प्रतिष्ठेसाठी भांडू नका. कमीपणा सहन करून काम करावे लागेल. विरुद्धलिंगी व्यक्तीकडून काम करून घेता येईल.
मिथुन – धंद्यात फायदा होईल. मित्र परिवार भेटेल. नवीन परिचयाने हुरळून जाऊ नका. कोर्टकेसमध्ये यश मिळेल.
कर्क – परिश्रमाने यश प्राप्त होईल. व्यवसायात वाढ होईल. प्रतिष्ठा वाढविणारी घटना घडेल. घरात आनंद मिळेल.
सिंह – अहंकाराने बोलल्यास वाद होईल. आर्थिक देवघेवीत फसगत संभवते. प्रवासात सावध राहा. तब्येत सांभाळा.
कन्या – सामान्य दिवस राहील. तडजोड केल्याने नुकसान होणार नाही. वाद वाढवू नका. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल.
तूळ – प्रतिष्ठित व्यक्तीबरोबर नवीन ओळख होईल. कला क्षेत्रात चांगली संधी मिळेल. पुरस्कार व सन्मान मिळेल.
वृश्चिक – अधिकार गाजवून काम करून घेण्याचा प्रयत्न करू नका. प्रेमाने वागा. स्नेहभावाने वागा म्हणजे अडचणी कमी होतील.
धनु – प्रलोभनांपासून दूर राहावे लागेल. प्रकृतीवर ताण पडेल. मुलांच्या सल्ल्याचा उपयोग होईल. आर्थिक लाभ होईल.
मकर – प्रेम व सहकार्य यामुळेच सहजीवन सुखी होते. अडचणीत जी व्यक्ती खरी आपल्या पाठीशी उभी राहते तीच आपली असते.
कुंभ – कुणावर दबाव दाखवून काम करण्याचा आग्रह धरल्यास गैरसमज व तणाव होण्याची शक्यता आहे. नम्रता ठेवावी लागेल.
मीन – मुलांच्यासाठी खर्च कराल. नवीन योजना अमलात आणता येतील. परिचय उत्साह वाढवेल. धंद्यात वाढ होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -