राशीभविष्यः शनिवार ०९ ऑक्टोबर २०२१

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष :- सहकारी, मित्र तुमच्या कार्याला सरकार्य करतील. धंद्यात एखादी घटना तुमच्या हिताची घडेल. मुले मदत करतील.

वृषभ :- स्वतःच्या खाण्याची काळजी घ्या. नवीनच ओळख झालेल्या माणसावर एकदम विश्वास टाकू नका. वाद होईल.

मिथुन :- ताण-तणावातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधता येईल. विचारांची दिशा बदलावी असे वाटेल. नम्र रहा.

कर्क :- प्रतिष्ठा वाढणारी घटना घडेल. कल्पनाशक्तीला चालना मिळेल. धंद्यात प्रगतीकारक घटना घडेल.

सिंह :- मित्रांचे सहाय्य घेता येईल. प्रेमाला चालना मिळेल. धंद्यातील गुंता समजून घ्या. कोर्टाचे काम करता येईल.

कन्या :- शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. कठीण काम मार्गी लावता येईल. जीवनसाथीचा शोध विवाहमंडळात घेता येईल.

तूळ :- मन अस्थिर होईल. धंद्यात मोठे काम मिळेल. नातलग, मित्र भेटतील. नवीन विषयाकडे आकर्षित व्हाल.

वृश्चिक :- कामांचा व्याप वाढेल. वेळेला महत्वा द्या. चिडचिडेपणा करून उपयोग होणार नाही. प्रवासात सावध रहा.

धनु :- प्रेमाची माणसे तुमच्या पाठीशी राहतील. कठीण काम करण्याचा प्रयत्न करा. धंद्यात लक्ष द्या. फायदा होईल.

मकर :- विचारपूर्वक घेतलेला निर्णय फायदेशीर ठरेल. भागीदार मिळेल. आर्थिक आवक वाढेल. स्पर्धेत यश मिळेल.

कुंभ :- प्रवासात नवीन ओळख होईल. तुम्हाला गरज असलेली व्यक्ती भेटेल. लिखाणाला चांगला विषय मिळेल.

मीन :- वाहन जपून चालवा. प्रेमापोटी जवळच्या माणसाला रागात बोलू नका. नंतर पश्चाताप होईल. पाकीट सांभाळा.