राशीभविष्य: शनिवार १४ मे २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष :- तुमच्यावर इतरांचा झालेला रोष मावळेल. मैत्री होईल. वाहन जपून चालवा. धंदा मिळेल.

वृषभ :- कामाचा व्याप वाढेल. अंदाज चुकेल. वेळेला महत्त्व द्या. खोटेपणा उघड होऊ शकतो.

मिथुन :- आजचे काम आजच करण्याची गरज आहे. आळस करू नका. महत्त्वाची भेट घेता येईल.

कर्क :- तुमच्या विचारांना सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळेल. मान मिळेल. पुरस्कार व पैसा मिळेल.

सिंह :- तुमचे मुद्दे मांडता येतील. त्यांना प्रभावी करण्यासाठी प्रेम व युक्ती वापरा.

कन्या :- प्रवासात वाहन नीट चालवा. स्वतःचेच मत खरे आहे यावर जास्त जोर देऊ नका.

तूळ :- आजचे काम उद्यासाठी ठेऊ नका. तुम्हाला विशेष संकेत मिळेल. कला क्षेत्रात रमून जाल.

वृश्चिक :- सहनशीलता ठेवा. मैत्रीच्या भावनेतून वागा. नोकर माणसांना समजून घ्यावे लागेल.

धनु :- पाहुणे येतील. आवडते पदार्थ कराल. धंद्यात वाढ होईल. मुलांचा सहवास मिळेल.

मकर :- दिशा मिळाल्याने तुमची कामे वेगाने होतील. गुंतवणूक करू शकाल. थकबाकी मिळवा.

कुंभ :- जीवनसाथीच्या संबंधी विचार कराल. दूरच्या प्रवासाचे ठरवाल. संधी चांगली मिळेल.

मीन :- महत्त्वाचा निर्णय घेता येईल. केस संपवता येईल. फायदेशीर कामे समोरून येतील.