राशीभविष्य: शनिवार १६ एप्रिल २०२२

Weekly Horoscope Future Sunday 12th June to Saturday 18th June 2022
राशीभविष्य

मेष :- तुमच्या डावपेचात तुम्ही यशस्वी व्हाल. प्रतिष्ठा मिळेल. धंद्यात सुधारणा होईल. मागील वसुली करा.

वृषभ :- धंद्यात खर्च वाढू शकतो. सहनशीलता ठेवा. मदत घेता येईल. कायद्याचे पालन करा.

मिथुन :- जीवनसाथीचे सहकार्य मिळवावे लागेल. तुम्ही रागावर ताबा ठेवा. कामे करून घेता येतील.

कर्क :- डोके शांत ठेवा. कोर्ट केस होऊ शकते. प्रतिष्ठा धोक्यात येईल. फाजिल आत्मविश्वास ठेऊ नका.

सिंह :- मुद्दे पटवून देण्यात यश मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नोकरीत फायदा होईल.

कन्या :- तुमचे स्पष्ट बोलणे सर्वांनाच आवडेल. प्रतिष्ठा मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल.

तूळ :- धंद्यात मेहनतीचे चांगले फळ मिळेल. खर्चावर बंधन ठेवणे कठीण होईल. नवीन काम मिळेल.

वृश्चिक :- कला क्षेत्रातील लोकांची ओळख होईल. गुप्त कारवाया समजून येतील. उत्तर देता येईल.

धनु :- महत्त्वाची कामे होतील. ओळखीची व्यक्ती असली तरी पैशाच्या व्यवहारात गाफील राहू नका.

मकर :- ताण-तणाव वाढेल. कामगाराची कमी धंद्यात होऊ शकते. वाहनाचा वेग कमी ठेवा.

कुंभ :- आजचे काम उद्यावर न टाकता आजच करा. धंद्यात नवीन ओळखीमुळे फायदा होईल.

मीन :- मागील बाकी वसूल करा. साहित्याला नवा विषय मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. यश मिळेल.