Maharashtra Assembly Election 2024
घरभविष्यआजचे राशीभविष्यHoroscope : शनिवार 16 नोव्हेंबर 2024

Horoscope : शनिवार 16 नोव्हेंबर 2024

Subscribe

मेष – चुकीच्या संगतीपासून दूर राहावे. योग्य पद्धतीने कठीण प्रकरण हाताळता येईल. धंद्यात वाढ होईल. वसुलीसाठी प्रयत्न करा.
वृषभ – गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. बोलताना संयम राखावा. चुकीच्या गोष्टींची चर्चा टाळावी. वरिष्ठ मदत करतील.
मिथुन – घरातील समस्या सोडवाल. आळस न करता कामाची जिद्द ठेवा. वाहन जपून चालवा. नवीन बदल स्वीकारावे लागतील.
कर्क – कामात थोड्या उशिराने यश मिळेल. स्वत:वर ठाम विश्वास ठेवावा. योग्य संधीचा लाभ घ्यावा. धरसोड वृत्ती टाळावी.
सिंह – जोखीम घेऊन कामे स्वीकारावी लागतील. तुमच्याकडे आर्थिक मदत मागणारे लोक येतील. कौटुंबिक वातावरणात रमाल.
कन्या – मुलांच्या प्रगतीमुळे मन आनंदी होईल. धंद्यात नोकरांची बाजू ऐकावी लागेल. अनाठायी खर्चाला आळा घालावा.
तूळ – कठीण काम लवकर करून घ्या. कठोर भाषा वापरू नका. प्रेमाची व्यक्ती मदत करेल. आळस झटकून कामाला लागावे.
वृश्चिक – सामाजिक कार्य आपण वेगाने पूर्ण कराल. नवीन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. अचानक प्रवास कराल.
धनु – तुम्ही ठरवलेले काम वेळेत पूर्ण झाल्याने वरिष्ठ खूश होतील. जुळून आलेली घडी विस्कटू देऊ नका. स्वमतावर ठाम राहावे.
मकर – संसर्गजन्य विकारांपासून सावधानता बाळगावी. आपल्या जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. पाहुण्यांचे स्वागत कराल.
कुंभ – कामातील अडचणी कमी होतील. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नयेत. विचारांना चालना मिळेल. कला क्षेत्रात प्रगती होईल.
मीन – महत्त्वाच्या कामाची नीट मांडणी करा. घरातील जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. नवीन ओळख होईल. रागावर नियंत्रण ठेवावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -