राशीभविष्य: शनिवार १८ जून २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : आजच्या कामात आळस करू नका. महत्त्वाचा प्रश्न सोडवता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल.

वृषभ : नवीन व्यक्तीचा परिचय होईल. तुमचा उत्साह राहील. रस्त्याने सावधपणे वागा.

मिथुन : तुमच्या कामाला वेगळी कलाटणी मिळेल. कला-क्रीडा स्पर्धेत पुढे जाल. प्रसिद्धी मिळेल.

कर्क : चर्चा, संवाद मनाप्रमाणे करता येईल. जीवनाचा साथीदार निवडता येईल. कल्पनाशक्ती वाढेल.

सिंह : वाटाघाटीत यश मिळेल. नोकरीत बदल करता येईल. थकबाकी मिळवा. प्रवासात लाभ होईल.

कन्या : घरातील कामे करताना सावध रहा. चूक होईल. एखादी वस्तू विसरण्याची शक्यता आहे.

तुला : मनाप्रमाणे महत्त्वाची कामे करून घ्या. भेट घेता येईल. धंद्यात वाढ होईल.

वृश्चिक : हौस-मौज करण्यासाठी नवा विचार कराल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. वेळ घालवू नका.

धनु : हक्काची माणसे भेटतील. धंद्याला नवा पर्याय मिळेल. स्पर्धेत जिंकाल.

मकर : आजचा दिवस धावपळीचा जाईल. कटकटी होऊ शकतात. वाद, तणाव वाढवू नका.

कुंभ : घरातील, बाहेरील कामे आजच करण्याचा प्रयत्न करा. यश मिळेल. सर्व मनाप्रमाणे होईल.

मीन : जास्त अरेवावी करू नका. उद्याचा दिवस तुमचा असेल. उतावळेपणा करू नका. नाते टिकवा.