मेष -गुरुतुल्य व्यक्तीची भेट घडेल. तुमचा मुद्दा वरिष्ठांना पटवून देता येईल. चर्चा यशस्वी करू शकाल. प्रकृतीची काळजी घ्यावी.
वृषभ – धंद्यातील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कराल. कामगारांची कमी भरून काढता येईल. अहंकार बाजूला सारा. चर्चा सफल होईल.
मिथुन – नोकरीत वरिष्ठांना मदत करावी लागेल. नोकर वर्गाला दुखवू नका. धंद्यात मोठे काम मिळवण्याचा प्रयत्न करा. सहलीचे योग आहेत.
कर्क – आजचा दिवस संमिश्र प्रतिसादाचा आहे. महत्त्वाचे काम करताना घाई करू नका. घरगुती वाद वाढवू नका. प्रतिष्ठा वाढेल.
सिंह – जबाबदारीची कामे करावी लागतील. आपले मनस्वास्थ्य ठीक ठेवावे. कुटुंबासमवेत तसेच मित्रमंडळीत वेळ घालवाल.
कन्या – कर्जाचे काम मार्गी लागेल. आपल्या धंद्यात सुधारणा करा. महिलांनी आजाराकडे दुर्लक्ष करू नये. आध्यात्मिक प्रगती होईल.
तूळ – आज ठरवलेले काम उद्यावर टाकू नका. बोलताना नम्रता ठेवा. आपणास मोठ्या लोकांचा सहवास लाभेल. कामात उत्साह राहील.
वृश्चिक – किरकोळ कामे करण्याचा आळस करू नका. तुमच्या कार्याला योग्य दिशेने नेता येईल. इतरांच्या कौतुकास पात्र ठराल.
धनु – नवीन योजना मार्गस्थ लागतील. आर्थिक नियोजन यशस्वी ठरेल. घरगुती कामे वाढतील. कामांची गर्दी झाल्याने धावपळ वाढेल.
मकर – व्यवसायात हाती घेतलेले काम पूर्ण कराल. मनावर दडपण येईल. वरिष्ठांची मर्जी राखाल. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल.
कुंभ – आपण प्रयत्नाने यश खेचून आणाल. शब्द जपून वापरावेत. नवीन परिचयापासून सावध राहावे. आर्थिक स्थिती उत्तम राहील.
मीन – कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवाल. घाईघाईत निर्णय घेऊ नये. आठवडाभराचे कामाचे नियोजन करावे. आपला धंदा वाढेल.
Horoscope : शनिवार 25 जानेवारी 2025
written By My Mahanagar Team
Mumbai