राशीभविष्य: शनिवार २७ मे २०२३

horoscope
राशीभविष्य

मेष : पोटाची काळजी घ्या. मनाविरुद्ध एखादे काम करावे लागेल. वागण्या-बोलण्यात चूक होईल.

वृषभ : तुमच्या प्रगतीचा मार्ग खुला होईल. ईश्वरी चिंतनाने मन आनंदी होईल. आवडते पदार्थ मिळतील.

मिथुन : प्रवासात किरकोळ अडचण येईल. अधिकारी वर्गाची मदत मिळू शकेल. नातलग भेटतील.

कर्क : आजचे काम आजच करून घ्या. भक्तीने मन भरून येईल. आवडते पदार्थ सेवनास मिळतील.

सिंह : कामाचा व्याप वाढला तरी प्रतिष्ठाही मिळेल. तणाव वाढवू नका. हेकेखोरपणाने प्रेम कमी होते.

कन्या : धंद्यात वाढ होईल. वरिष्ठांची मर्जी राखा. भावनेच्या भरात थट्टा करताना संयम ठेवा.

तुला : धंद्यात फायदा होईल. तुम्ही ठरविलेले काम पूर्ण करता येईल. भावनांना आवर घाला.

वृश्चिक : निश्चयाने केलेले काम पूर्ण होईल. तुमचा अंदाज बरोबर येईल. दुसर्‍याची काळजी घ्या.

धनु : महत्त्वाची वस्तू सांभाळा. मनावर दडपण येईल. वेळ फुकट जाण्याची शक्यता आहे. अंदाज चुकेल.

मकर : आजचे काम करून घ्या. चर्चा सफल होईल. तुमच्या कार्याचे कौतुक सर्वत्र होईल.

कुंभ : शेजारी तुम्हाला कामे सांगतील. भावना व व्यवहार यांचा नीट मेळ साधावा लागेल.

मीन : तुमच्या कामावर वरिष्ठ खूश होतील. सुग्रास भोजन मिळेल. मन प्रसन्न राहील.