मेष – प्रयत्नांना यश मिळेल. रागावर नियंत्रण ठेवावे. बुद्धिकौशल्याने वाद संपुष्टात येऊ शकतील. नवीन योजनांवर लक्ष केंद्रित करावे.
वृषभ – आपला निर्णय स्वतःच घ्या. व्यापारी वर्गाला अधिक धावपळ करावी लागेल. सरकारी योजनांचा लाभ मिळवू शकाल.
मिथुन – नोकरी, व्यवसायातील जटील प्रश्न मार्गी लागतील. नवीन कार्यारंभासाठी अनुकूल कालावधी आहे. अनुभव कामी येईल.
कर्क – नको त्या प्रलोभनात अडकू नका. आपल्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे. रचनात्मक कार्याची गोडी निर्माण होईल.
सिंह – कार्यक्षेत्रात कठोर मेहनतीनंतर यशप्राप्ती शक्य होईल. वडिलांचे सहकार्य मोलाचे ठरेल. अनावश्यक खर्च टाळावेत.
कन्या – कार्यक्षेत्रात सकारात्मक बदल घडतील. लाभाच्या उत्तम संधी प्राप्त होऊ शकतील. प्रतिकूल परिस्थितीत रागावर नियंत्रण ठेवा.
तुळ – जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करू नयेत. मुलांची चिंता मिटेल. आध्यात्मिक आवड वाढेल.
वृश्चिक – काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा मिळेल. घरातील मोठ्या व्यक्तींचा मान राखा. दैनंदिन कामात वेळकाढूपणा करू नये.
मकर – प्रलंबित येणी प्राप्त होऊ शकतील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. हितशत्रू निष्प्रभ होतील. बोलताना तारतम्य बाळगावे.
धनु – आर्थिक स्थिती सुधारण्यासाठीचे प्रयत्न यशस्वी ठरू शकतील. नातेसंबंध दृढ होतील. गुंतवणुकीत जोखीम पत्करू नये.
कुंभ – आपली मेहनत आणि परिश्रमाचे चीज होईल. मुलांकडून शुभवार्ता मिळतील. काही जटील समस्यांचे निराकरण होईल.
मीन – कार्यक्षेत्रातील सहकार्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. जमाखर्चात संतुलन ठेवणे हितावह ठरेल. आपला करारीपणा शाबूत ठेवा.
Horoscope : शनिवार, 28 डिसेंबर 2024
written By My Mahanagar Team
Mumbai