Homeभविष्यआजचे राशीभविष्यHoroscope : शनिवार 4 जानेवारी 2025

Horoscope : शनिवार 4 जानेवारी 2025

Subscribe

मेष – अचूक मार्गदर्शनाने लाभ होईल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. नोकरी-व्यवसायात दुर्लक्षित मुद्दे ऐरणीवर आणाल.

वृषभ – नोकरी-व्यवसायात अधिक मेहनत घ्यावी लागेल. परिस्थितीचा अभ्यासपूर्वक विचार करावा. चिडचिड वाढेल.

- Advertisement -

मिथुन – नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. कामाची पत सुधारेल. कामाचे सुनियोजन कराल.

कर्क – सहकारीवर्गाच्या मदतीने मत मांडाल. जोडीदारासह भविष्याचे आराखडे आखाल. वैद्यकीय तपासणी करावी.

- Advertisement -

सिंह – विचारांना योग्य दिशा देणे आवश्यक आहे. इतरांच्या समस्यांना वाचा फोडाल. कुटुंबात शिस्तीला महत्त्व द्याल.

कन्या – अधिकाराचा योग्य वापर कराल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. नातेवाईकांच्या मदतीला धावून जाल.

तुळ – नको तिथे धाडस दाखवू नये. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. जोडीदारासह सूर जुळतील. खरेदीचा आनंद लुटाल.

वृश्चिक – भविष्याचा व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार कराल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. विचारांना स्थिरता हवी.

धनु – हितशत्रूंवर वेळीच ताबा मिळवाल. नोकरी-व्यवसायात नवे करार स्वीकाराल. कामानिमित्त प्रवास संभवतो.

मकर – कार्याची पूर्तता करण्यासाठी मेहनत घ्याल. सहकारी वर्ग अपेक्षेनुसार वागणार नाही. पर्यायी व्यवस्था तयार ठेवाल.

कुंभ -वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. व्यवस्थितपणाचा अतिरेक करू नका.

मीन – आपली कर्तव्ये पार पाडाल. जोडीदाराला चांगली साथ द्याल. काही घरगुती प्रश्न सामोपचाराने सोडवाल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -