मेष – स्वकौशल्याने तोट्याचे नफ्यामध्ये रूपांतर कराल. धावपळ व दगदग होईल. आगंतुक पाहुणे येतील. नवीन ओळखी होतील. वृषभ – प्रिय व्यक्तीशी संपर्क करणे शक्य होईल. कामात किरकोळ अडचण येईल. प्रकृतीची काळजी घ्या. कौटुंबिक गरजा समजून घ्या. मिथुन – प्रलंबित देणी फेडाल. मानसिक आघातावर आपण धैर्याने मात कराल. सौम्य शब्द वापरा. समाजात मान आणि प्रतिष्ठा वाढेल. कर्क – जोडीदाराचा भक्कम पाठिंबा मिळेल. मानसिक ताण असला तरी आरोग्यावर परिणाम होणार नाही. कोर्ट केसमध्ये यश मिळेल. सिंह – अतिउदार स्वभावामुळे गैरफायदा घेतला जाईल. काही कारणाने मन अस्थिर होईल. अनपेक्षित भेटवस्तू मिळेल. धंद्यात वाढ होईल. कन्या – आपली आर्थिक आवक समाधानकारक राहील. काटेकोरपणे बोलणे टाळा. कोर्टकेस जिंकाल. प्रतिष्ठा मिळेल. जुन्या आठवणी येतील. तूळ – तुमच्याशी स्पर्धा करणारे लोक वाढतील, पण सकारात्मक दृष्टिकोनामुळे अनेक अडचणींवर सहज मात कराल. थकवा दूर होईल. वृश्चिक – योजनांना गती देता येईल. रेंगाळत राहिलेली कामे पूर्ण कराल. मनाची अस्थिरता कमी होईल. आहारावर नियंत्रण ठेवावे. धनु – साहस व पराक्रमामुळे आपला आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. घाईने निर्णय घेणे टाळावे. अचानक काही अपरिहार्य खर्च संभवतात. मकर – मानसिक शांतता आणि प्रसन्नता लाभेल. आर्थिक व्यवहार सावधगिरीने करावेत. वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी. कुंभ – आध्यात्मिक आवड वाढेल. आवडीचे काम करण्याची संधी मिळेल. मोसमी आजार त्रस्त करू शकतात. इतरांना मदत करावी लागेल. मीन – मिळकतीचे नवे स्रोत सापडतील. किरकोळ समस्यांना सामोरे जावे लागू शकेल. गैरसमज दूर होतील. आनंदाची अनुभूती घ्याल.