मेष – नोकरीत बदल करण्याचा प्रयत्न यश देईल. धंदा वाढेल. कौटुंबिक सौख्य जाणवेल. प्रवासामध्ये दक्षता बाळगावी.
वृषभ -जिद्दीने कठीण कामात यश मिळवाल. जवळच्या व्यक्तींची मर्जी पाहून मत व्यक्त करा. धंद्यात लक्ष द्या. खरेदी करताना पाकीट सांभाळा.
मिथुन – धंद्यात फायदा होईल. सावधपणे व्यवहार करा. विलंब सहन करा. घरातील माणसांना दुखवू नका. सहकार्यांकडून मदत मिळेल.
कर्क – आर्थिक अडचण कमी होईल. घरात क्षुल्लक वाद होईल. व्यवसायामध्ये नवीन संधी प्राप्त होतील. जुनी कामे मार्गी लावू शकाल.
सिंह – कुटुंबाशी निगडित प्रश्न सोडवता येतील. लोकांचे सहकार्य लाभेल. नवे कंत्राट मिळवता येईल. स्पर्धा जिंकाल. वादविवाद टाळावेत.
कन्या – व्यवसायात स्थिरता जाणवेल. महत्त्वाची वस्तू वेळच्या वेळी जागेवर ठेवा. कोर्ट-कचेरीच्या प्रकरणांत सावधगिरी बाळगा.
तूळ – विचारांना चालना मिळेल. कला-क्रीडा-साहित्यात प्रसिद्धी मिळेल. नवीन परिचय होईल. वाहने जपून चालवावीत.
वृश्चिक – व्यवसायाला कलाटणी आणि प्रेमाला चालना मिळेल. आनंदाची बातमी कळेल. कोणाच्या भावना दुखावतील असे वागू नका.
धनु – तुमच्या ध्येयाला सर्वांची मदत मिळेल. मित्रमंडळींमध्ये आनंदी वेळ जाईल. वादविवाद टाळावेत. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी.
मकर – नोकरीत प्रगती होईल. प्रकृतीची काळजी घ्यावी. नवीन ओळखी वाढतील. महिला, गृहद्योगांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील.
कुंभ – नोकरी-व्यवसायात क्षुल्लक अडचणी येतील. कौतुकाचे बोल ऐकाल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. आप्तेष्टांचा सहवास लाभेल.
मीन – अडचणींवर मात कराल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. मानसिक संतुलन ढळू देऊ नका. व्यापारात अनुकूल वातावरण राहील.
Horoscope : शनिवार 1 फेब्रुवारी 2025
written By My Mahanagar Team
Mumbai