घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य: शनिवार १८ फेब्रुवारी २०२३

राशीभविष्य: शनिवार १८ फेब्रुवारी २०२३

Subscribe

मेष : राजकीय-सामाजिक कार्यात वेगाने प्रगती करता येईल. धंद्यात वाढ होईल. प्रेमाने लोकांना जिंका.

वृषभ : दुपारनंतर तुमची कामे होण्यास सुरुवात होईल. घरात सकाळी वाद होईल. संयम ठेवा.

- Advertisement -

मिथुन : सकाळी होणारी कामे दुपारनंतर रेंगाळण्याची शक्यता आहे. अरेरावी सुरळीतपणे होऊ शकतील.

कर्क : महत्त्वाची कामे लंचनंतर सुरळीतपणे होऊ शकतील. गुप्त कारवायांचा बंदोबस्त करता येईल.

- Advertisement -

सिंह : क्षुल्लक गोष्टींच्या वादावरून प्रश्न अधिक चिघळू शकतो. धंद्याकडे लक्ष द्या. प्रेमाने वागता येईल.

कन्या : घरातील व्यक्तींना सांभाळून घेता येईल. तुमची प्रतिष्ठा वाढेल. खाण्याची काळजी घ्या.

तूळ : किरकोळ कारणाने वाद होऊ शकतो. वरिष्ठांच्या मर्जीनुसार तुम्हाला काम करावे लागेल. धंदा नीट करा.

वृश्चिक : महत्त्वाच्या कामात यश मिळेल. चिडचिड करून प्रश्न सोडवता येत नाही. जिद्द ठेवा. युक्ती करा.

धनु : धंद्यात वाढ करता येईल. मेहनत घ्या. नम्रपणे सर्वांच्या बरोबर वागल्यास जास्त यश मिळेल.

मकर : सकाळचा तणाव दुपारनंतर कायम होईल. धंद्यात वाढ करा. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

कुंभ : मनावर दडपण आल्याने तुमचा गोंधळ निर्माण करू शकतो. प्रवासात सावध रहा. काम वाढेल.

मीन : महत्त्वाच्या कामांना प्रथम प्राधान्य द्या. मैत्री वाढेल. स्पर्धा जिंकाल. मान-प्रतिष्ठा मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -