राशीभविष्य : शनिवार ,२३ जानेवारी २०२१

horoscope
राशीभविष्य

मेष : महत्त्वाचे काम आजच करण्याचा प्रयत्न करा. योग्य निर्णय घेऊ शकाल. कला-क्रीडा स्पर्धेत चमकाल. धंदा वाढेल.

वृषभ : नोकरीत वरिष्ठांना खुष करता येईल. नवे मित्र तयार करता येतील. घरातील कामे करता येतील. धंदा वाढेल.

मिथुन : रागाच्या भरात कोणताही अंदाज घेऊ नये. चूक होऊ शकते. वाहन जपून चालवा. वृद्ध व्यक्तीसाठी धावपळ होईल.

कर्क : कठोर बोलण्यामुळे तणाव निर्माण होईल. वस्तु वेळच्या वेळी जागेवर ठेवा. पोटाची काळजी घ्या. वसूली करा.

सिंह : तुमचा उत्साह वाढेल. इतरांची तुमच्या कामाला साथ मिळावी असे तुम्हाला वाटेल. सौम्य धोरण ठेवा.

कन्या : नोकरीत कामे वाढेल. तुमचा प्रभाव टिकवता येईल. जवळचे लोक निष्कारण काड्या घालण्याचा प्रयत्न करतील.

तूळ : ठरविलेले काम पूर्ण करण्यात अडचणी येतील. पण जिद्द ठेवा यश मिळेल. अंदाज नीट घ्या. पाहुणे येतील.

वृश्चिक : क्षुल्लक कारणाने वाद होऊ शकतो. नम्रता ठेवा. तुमच्या मनाप्रमाणे काम करून घ्या. संयम ठेवा.

धनु : खंबीरपणे एखादा निर्णय घ्याल. तुमची मैत्री पटकन होते. तुमच्या कामाचे कौतुक होईल. नोकरी मिळेल.

मकर : कार्याला दिशा मिळेल. नवीन ओळखी होतील. धंद्यात वाढ करता येईल. मन चिंतनात रमेल.

कुंभ : मनाची अस्थिता झाली तरी कामे होतील. वरिष्ठांच्या मर्जीनुसार नोकरीत निर्णय घ्या. मैत्री होईल.

मीन : तुमच्या वागण्याचा, बोलण्याचा अर्थ समोरच्या व्यक्तीला कळण्यास वेळ लागू शकतो. धंधा मिळवा.