राशीभविष्य: शनिवार, ८ जानेवारी २०२२

horoscope daily horoscope horoscope Tuesday 11 july 2022
राशीभविष्य

मेष :- नवीन विषयात रस घ्याल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. धंद्यात लाभ मिळेल. प्रेमाची व्यक्ती भेटेल.

वृषभ :- विचारांचा गुंता न करता ध्येयावर लक्ष ठेवा. मोठ्या लोकांची ओळख उपयोगी पडेल.

मिथुन :- तुमचे काम विलंबाने होईल. शेजार्‍याबरोबर मतभेद होतील. खाण्या-पिण्याची चंगळ त्रासदायक ठरेल.

कर्क :- आजचे काम आजच वेळेत होऊ शकेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. थकबाकी वसूल करा.

सिंह :- कठीण काम करून घेता येईल. वरिष्ठांच्या मर्जीत रहाल. नातलगांच्या मदतीला जावे लागेल.

कन्या :- धंद्यात वाढ होईल. कामगारांची समस्या सोडवता येईल. प्रकरणात रेंगाळत राहू नका.

तूळ :- कोणतेही काम वेळेत पूर्ण करण्याचे ठरवा. रागाने बोलल्यास फायदा होणार नाही. सावधपणे चाला.

वृश्चिक :- चांगल्या व्यक्तीचा परिचय होईल. नवे संबंध जोडले जातील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल.

धनु :- आळस केल्यास कामे अर्धवट राहतील. पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल. गाडी नीट चालवा.

मकर :- मुलांच्या प्रगतीची बातमी आनंद देणारी असेल. धंद्यात जम बसेल. मागील येणे वसूल करा.

कुंभ :- विरोध मोडून काढता येईल. कल्पना कृतीत उतरवण्याचा प्रयत्न करता येईल. कौतुक होईल.

मीन :- ठरविलेले काम पूर्ण करू शकाल. मोठ्या व्यक्तीकडून फायदेशीर आश्वासन तुम्हाला मिळेल.