राशीभविष्य: शनिवार ०९ जुलै २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : क्षुल्लक तणाव सुद्धा तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो. खाण्या-पिण्याची चंगळ त्रासदायक ठरू शकते.

वृषभ : तुमच्या कार्याला दिशा मिळाल्याने उत्साह वाढेल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. वेळेला महत्त्व द्या.

मिथुन : अपेक्षा वाढतील. नोकरीत फायदा होईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. प्रगती होईल.

कर्क : ताण-तणाव कमी होईल. तुम्ही ठरविलेले काम पूर्ण होईल. कल्पनाशक्ती वाढेल.

सिंह : तुमच्या कामात काड्या घालण्याचा प्रयत्न होईल. खर्च वाढेल. धंद्यात काम मिळेल. संयमाने बोला.

कन्या : महत्त्वाच्या विषयावर चर्चा करता येईल. थकबाकी वसूल करा. धंद्यात लक्ष द्या.

तूळ : परिस्थितीचा सामना करावा लागेल. तटस्थ भूमिका घ्या. नाराजी दूर करता येईल.

वृश्चिक : महत्त्वाच्या कामाला वेग येईल. अधिकार मिळेल. आप्तेष्ठ भेटतील. आळस करू नका. धंदा मिळेल.

धनु : थकवा वाटेल. क्षुल्लक प्रकृतीची तक्रार जाणवेल. नातलगांची मदत चांगली झाल्याने प्रश्न सुटेल.

मकर : घरगुती वातावरण आनंदी राहील. वाटाघाटीत यश मिळेल. तुमचा प्रभाव समाजात वाढेल.

कुंभ : नको असलेली व्यक्ती भेटेल. राग अनावर होईल. पोटाची काळजी घ्या. वाहन जपून चालवा.

मीन : आजचे काम उद्यासाठी ठेऊ नका. चर्चा होईल. वाटाघाटीत यश मिळेल. नवीन ओळख होईल.