Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : शनिवार ,२० मार्च २०२१

राशीभविष्य : शनिवार ,२० मार्च २०२१

Related Story

- Advertisement -

मेष :- कठीण प्रश्नावर तोडगा शोधता येईल. नवे परिचय होतील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. नम्रता ठेवा.

वृषभ :- धंद्यात फायद्याची चर्चा करता येईल. ओळखीतून काम मिळेल. आळस न करता तुम्ही प्रयत्नाने पुढे जाल.

- Advertisement -

मिथुन :- कोर्टाच्या कामात योग्य व्यक्तींचा सल्ला घ्या. हायब्लड प्रेशरचा त्रास वाढू शकतो. मनावर दडपण येईल.

कर्क :- महत्त्वाचे काम करून घ्या. तुम्हाला नवे काम मिळेल. घरातील तणाव कमी होईल. संतती प्राप्तीचा प्रयत्न करा.

- Advertisement -

सिंह :- राजकारणात तुमच्यावर आरोप होईल. जवळचे लोक तुम्हाला मदत करतील. विरोध करणारे मैत्री करतील.

कन्या :- तुमच्या कार्याला दिशा मिळेल. घर, जमीन यासंबंधी समस्या सोडवा. कोर्ट केस जिंकाल. कौतुक होईल.

तूळ :- मन उदास होईल. चौफेर मनावर दडपण आणणारे वातावरण आहे असे वाटेल. कठोर बोलू नका.

वृश्चिक :-तुमचा उत्साह वाढेल. कठीण काम करून घ्या. मान-प्रतिष्ठा वाढेल. धंद्यात सुधारणा होईल.

धनु :- शेजारी तुमच्या गतीवर टीका करतील. पैशांच्या व्यवहारात सावध रहा. मौल्यवान वस्तू सांभाळा. फसगत टाळा.

मकर :- महत्वाचे काम करून घ्या. वाहनासंबंधी समस्या येऊ शकते. धंद्यातील तणाव कमी होईल. चर्चा करता येईल.

कुंभ :- किरकोळ कारणाने डोके गरम होईल. रागावर ताबा ठेवा. घरात तणाव, वाद होईल. वाहन जपून चालवा.

मीन :- रेंगाळलेली कामे करून घ्या. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. मान प्रतिष्ठा मिळेल. यश मिळवाल.

- Advertisement -