राशीभविष्य : शनिवार, २८ नोव्हेंबर २०२०

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : राजकीय-सामाजिक कार्यात यश मिळेल. तुमचा विचार इतरांना पटवून देता येईल. मान-प्रतिष्ठा मिळेल. थोडे कठीण आहे.

वृषभ : सकाळी तणाव होईल. पोटाची काळजी घ्या. दुपारनंतर तुमचे प्रयत्नांना यश मिळेल. धंद्यात लक्ष द्या.

मिथुन : सकाळी महत्त्वाचे काम करून घ्या. दुपारनंतर अडचण येईल. घरातील वडील माणसांना कमी लेखू नका.

कर्क : दुपारनंतर कामे होतील. रागावर ताबा ठेवा. तुमच्या अपयशाचे खापर दुसर्‍यावर फोडू नका.

सिंह : संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. अरेरावी करून चालणार नाही. दुपारनंतर अडचण येईल.

कन्या : वेगाने कामे करून घेता येईल. क्षुल्लक कारणाने तुमचा मूड जाऊ शकतो. धंद्यात वाढ होईल.

तूळ : कार्यात यश मिळेल. धंद्यात चांगली घटना घडेल. आपल्या लोकांच्यासाठी धावपळ कराल. ओळख होईल.

वृश्चिक : तुमचा आत्मविश्वास वाढेल. वाहन जपून चालवा. वरिष्ठांच्या मनात तुमच्याबद्दल आदर वाढेल.

धनु : राजकीय डावपेच यशस्वी करण्याचा प्रयत्न करा. मैत्री उपयोगी पडेल. वरिष्ठांना तुमचे मत सांगा. जिद्द ठेवा.

मकर : सकाळी झालेला वाद दुपारनंतर मिटवता येईल. तुमचे महत्त्व टिकवणे फार महत्त्वाचे आहे. काम करा.

कुंभ : सकाळी महत्त्वाचे काम करा. दुपारनंतर विलंबाने काम होईल. प्रवासात अडचण येऊ शकते.

मीन : आजचे काम करून घ्या. धंद्यात वाढ करता येईल. स्पर्धेत प्रगती होईल. उत्साह वाढेल.