मेष :- योजना तयार करून ठेवा. भेटीत यश मिळेल. धंद्यात सुधारणा करू शकाल. अहंकाराची भाषा वापरू नका. यश मिळू शकेल.
वृषभ :- कोर्टाच्या कामात महत्वाचे मुद्दे समजून घ्या व बोला. मोठ्या लोकांची मदत मिळेल. प्रगतीची संधी मिळेल. स्पर्धा जिंकता येईल.
मिथुन :- कठीण परिस्थितीवर कशी मात करावयाची हे शिकण्यास मिळेल. जिद्द ठेवा. प्रयत्न करा. नम्रता ठेवा. जास्त अपेक्षा ठेऊ नका.
कर्क :- घरातील व्यक्तींच्या बरोबर किरकोळ वाद होईल. खर्च वाढेल. धंद्यात समस्या येतील. यांत्रिक बिघाड होण्याचा संभव.
सिंह :- समस्या सोडवता येईल. शांत चिंताने विचार करू शकाल. धंदा वाढेल. खर्च करावा लागेल.
कन्या :- मन उदास राहील. धावपळ वाढेल. आरोप येतील. गुप्त कारवायांचा त्रास होऊ शकतो. बोलताना संयम ठेवा.
तूळ :- ठरविलेली कामे वेळेत पूर्ण होतील. धंद्यातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करता येईल. महत्वाची भेट घेता येईल.
वृश्चिक :- कुणालाही कमी समजू नका. अंदाज मागे-पुढे होऊ शकतो. वेळेला व कामाला महत्व दिल्यास यश मिळेल.
धनु :- अपेक्षित व्यक्तींची भेट घेता येईल. मार्ग मिळेल. धंद्यात सुधारणा करू शकाल. वरिष्ठांना मानाने वागवा.
मकर :- आत्मविश्वास वाढेल. डावपेच यशस्वी होऊ शकतात. वेळ फुकट घालवू नका. ठरविलेला कार्यक्रम पूर्ण होऊ शकेल.
कुंभ :- मनाची चंचलता होईल. विलंबाने काम पूर्ण होईल. धंदा मिळेल. नवीन विषयाचा अभ्यास करून मग बोला.
मीन :- उत्साहाच्या भरात कोणताच निर्णय घेऊ नका. गुप्त शत्रूला कमी लेखू नका. थोरा-मोठ्यांची मदत घेण्याचा प्रयत्न करा.