मेष ः- नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी सांभाळता येईल. आपल्या कामाची दाद दिली जाईल. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, जेणेकरून प्रकृतीच्या तक्रारी उद्भवणार नाहीत. कामाचा योग्य निपटारा करता येईल. नव्या ओळखींचा लाभ घेता येईल. सरकार दप्तरीची कामे मार्गी लागतील. इतरांना बोलण्यापेक्षा कृतीवर भर देणेच हितकारक राहील. नको त्या अपेक्षा न बाळगणेच चांगले राहील. कलाक्षेत्रात उत्तम काम करण्याची संधी प्राप्त होईल. राजकीय क्षेत्रात जम बसवता येईल. प्रवासाचे योग येतील. घरगुती वातावरण छान राहील. शेतीविषयक कामांना चालना मिळेल. आप्तेष्टांच्या गाठीभेटीचे योग येतील. शुभ दि. ११,१४
वृषभ ः- आपल्या कामकाजाला जास्त महत्त्व देऊन त्याला योग्य न्याय दिल्यास आपण पुढची वाटचाल करू शकाल. व्यापार-उद्योगात प्रगती करण्याची संधी मिळू शकेल. हितशत्रूंच्या कारवायांवर नजर ठेवा. येणार्या प्रसंगांना धैर्याने सामोरे जा व आपले अस्तित्व आबाधित ठेवावे. कोर्टकचेरीच्या कामात यश संभवते. आपल्यातील सृजनशक्तीला जागे करा. आर्थिक व्यवहार सावधगिरीने करणे इष्ट राहील. वेळप्रसंगी तज्ज्ञांचे मार्गदर्शन अवश्य घ्यावे. सर्व बाबतीत स्वयंसिद्ध राहणेच योग्य ठरेल. प्रकृतीची पथ्ये पाळा. विद्यार्थ्यांना अध्ययनात प्रगती करता येईल. क्रीडा क्षेत्रात यशाची अपेक्षा ठेवू शकता. शुभ दि. १०,१५
मिथुन ः- आपल्या सृजनशक्तीला नवे रूप देण्याचा प्रयत्न करणे हितकारक ठरणार आहे. मुलांकडून काही शुभवार्ता ऐकण्यास मिळतील. बौद्धिक क्षेत्राला चांगले प्रोत्साहन मिळेल. व्यापार-उद्योगात प्रगती करता येईल. कौटुंबिक जीवनात वादासारख्या प्रसंगांना आमंत्रण मिळणार नाही याची दक्षता घ्या. आपली आवक ठीक राहील. व्यापार-व्यवसायात काही काळ महत्त्वाचे निर्णय घेण्याचे कटाक्षाने टाळणे सर्व दृष्टीने योग्य राहील. घरगुती काही प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता राहील, तेव्हा सामंजस्याने परिस्थिती हाताळा. कलागुणांना वाव मिळेल. आप्तेष्ठांशी चांगले संबंध ठेवा. धार्मिक कार्यात रस घ्याल. शुभ दि. १३,१४
कर्क ः- स्पर्धा, साहसी कृत्ये यापासून दूर राहणेच हितकारक राहील. आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करा व आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करा. आपल्या बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवावे. प्रॉपर्टीची कामे अतिशय विचारपूर्वक करावीत. सर्वांशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारणेच योग्य ठरेल. मुलांकडून काही शुभ संकेत मिळण्याची शक्यता राहील. गैरसमजापासून दूर राहा. विद्यार्थीवर्गासाठी चांगला काळ राहील. नोकरवर्गाच्या समस्या दूर होतील. आपल्या योजना कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करा. कामाचा उत्साह वृद्धिंगत होईल. मुलांच्या मागण्या वाढतील. खर्चावर योग्य नियंत्रण ठेवा. शुभ दि. ९, १२
सिंह ः- नियोजित कामे वेळेवर पूर्ण कराल. व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्याचे प्रस्ताव मिळतील. नोकरदार लोकांच्या सुविधा अधिक वाढू शकतात. विद्यार्थ्यांची अभ्यासात रुची वाढेल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. हितशत्रूंच्या कारवायांवर कडक नजर ठेवावी. हाती घेतलेल्या कामात सफलता मिळू शकेल. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. कायदा व नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्या. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा व योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. वरिष्ठांची मर्जी सांभाळता येईल. प्रलोभनांना भुलू नका. मुलांकडून सुवार्ता ऐकण्यास मिळाल्याने मन आनंदी राहील. शुभ दि. १३,१४
कन्या ः- नवीन उद्योग-व्यवसाय करण्याची इच्छा असल्यास ते आपल्या जोडीदाराच्या नावे करणे अधिक लाभदायक राहील. प्रकृतीमान सर्वसाधारणपणे चांगले राहील. व्यापार-व्यवसायात काहीशी संथपणे निश्चित प्रगती साधता येईल. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. मित्रमंडळींशी सामंजस्याने वागणेच ठीक राहील. प्रवासाचे योग येतील. सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहाल. आपले विचार इतरांना पटवून देऊ शकाल. खर्चाचे प्रमाण फार वाढणार आहे, तेव्हा प्रथमपासूनच अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. हितशत्रूंची चिंता करण्याचे कारण नाही, ते गप्प बसतील. कोणालाही जामीन राहू नका. शुभ दि. ९,१३
तुळ ः- तुमची नियोजित सर्व कामे पूर्ण होतील. प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. चैनीच्या वस्तूंवर अचानक पैसे खर्च करावे लागतील. तुमचे मन शांत राहील. तुम्हाला थोडा संघर्ष केल्यानंतर यश मिळेल. कुटुंब आणि कार्यालयातील समस्या सोडवाव्या लागतील. नोकरदार लोकांसाठी हा काळ अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी नवीन शक्यता निर्माण होतील. कोर्टाच्या कामात अपेक्षित यश मिळेल. आपला आत्मविश्वास गमावू नका. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. थोरामोठ्यांचे मार्गदर्शन मिळणे शक्य होईल. त्यांच्याकडून योग्य ती मदतही मिळू शकेल. शुभ दि. १२,१५
वृश्चिक ः- आपल्या प्रगतीची वाटचाल सुरू राहील. योग्य प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळू शकेल. आर्थिक बाजू सावरता येईल. गर्भवतींना अपेक्षित संततीसुख मिळू शकते. कुटुंबात आनंदाचे वारे वाहतील. मुलांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. प्रवासाचे योग येतील. आपली फसवणूक होणार नाही याची खातरजमा करा. नको त्या प्रलोभनात अडकू नका. नवीन कामाच्या संधी प्राप्त होण्याची शक्यता राहील. कौटुंबिक जीवनात मिळणारा पाठिंबा व सहकार्याने आपले आर्थिक यश जपता येईल. नव्या ओळखींचा लाभ घेता येईल. कायदा-नियमांचे कटाक्षाने पालन करा. ज्येष्ठ व अनुभवी व्यक्तींचा पाठिंबा मोलाचा ठरेल. शुभ दि. १०,१४
धनु ः- प्रकृती अस्वास्थ्य व मानसिक दुर्बलतेवर योग्य उपाययोजना त्वरित केल्यास आपण या सप्ताहात मोठी झेप घेऊ शकाल. नोकरी-व्यवसायात प्रगती करू शकाल. आर्थिक प्रकरणात अनुकूलता मिळेल. महत्त्वाच्या कागदपत्रांवर वाचल्याशिवाय स्वाक्षर्या करणे टाळा. आपल्या नियोजित कार्यात विशेष लक्ष द्यावे. वैवाहिक जीवनात गैरसमज होणार नाहीत याची दक्षता घ्या. मुलांची प्रगती आपणास सुखावणारी राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा. नोकरदारांनी आपल्या वरिष्ठांशी मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारणेच हितकारक ठरू शकेल. व्यापारीवर्गाने अंधविश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करण्याचे टाळावे. शुभ दि. ९,१३
मकर ः- कला व साहित्य क्षेत्रातील व्यक्तींनी जरा जपून राहणे योग्य ठरेल. कारण एखादा लोकापवाद अंगाशी येण्याची शक्यता राहील. आपले शब्दप्रयोग मात्र चांगले असावेत. बांधकाम व्यावसायिक, वाहन विक्रेते अशा मंडळींना एखादी चांगली संधी मिळू शकते. खाण्यापिण्याची पथ्ये कटाक्षाने पाळावीत. काही संकटांची शक्यता त्यांच्या उपायांसह येण्याची शक्यता राहील. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन व सल्ला याचा लाभ घेऊन त्यातून मार्ग काढता येईल. प्रसिद्धीच्या मागे न राहणे योग्य ठरेल. जोडीदाराचा किंवा भागीदाराचा सल्ला मोलाचा राहील. आर्थिक बाजू सावरता येईल. वैवाहिक जीवन चांगले राहील. शुभ दि. ११,१५
कुंभ ः- दूरदर्शीपणा, उत्तम निर्णयक्षमता आणि गुरुतुल्य व्यक्तींचा सल्ला यांचा उपयोग करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. सध्या कोणतेही धाडस न करणेच इष्ट राहील. स्थावरबाबतच्या प्रश्नांना चालना मिळेल. वैवाहिक जीवनात काही मतभेदाची शक्यता असली तरी ते सामंजस्याने सोडवावेत. ज्येष्ठांचा सल्ला व मार्गदर्शन आपल्याला उपयुक्त ठरेल. नको त्या संगतीत राहणे आपणास त्रासदायक ठरू शकते, तेव्हा सावध राहा. गोड बोलून आपला कार्यभाग साधण्याचे धोरण स्वीकारणे हितकारक ठरणार आहे. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आर्थिक बाजू सावरता येईल. व्यापारात प्रगती करण्याची संधी प्राप्त होईल. शुभ दि. १०,११
मीन ः- कौटुंबिक वातावरण शांततामय ठेवल्यास आपल्या नोकरी-व्यवसायातील कामांना चांगली गती देऊ शकाल. वरिष्ठांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या कार्यात मग्न राहिल्यास आपले ध्येय गाठणे शक्य होईल. प्रलोभने व कुसंगतीपासून मात्र बाजूला राहणेच योग्य ठरेल. सध्या विरोधकांची धास्ती बाळगण्याचे कारण नाही, त्यांचा विरोध थिटा पडेल. मनाप्रमाणे खरेदी करता येईल. या सप्ताहात आपला खरा मित्र कोण हे पारखणे आवश्यक ठरणार आहे. आर्थिक बाबीत सावधानता बाळगणे अधिक हितकारक ठरणार आहे. आपल्या दैनंदिन कामासाठी वेळेत केलेले बदल यांचा चांगला परिणाम दिसून येईल. शुभ दि. ९,१२