मेषः- दुसर्याचा राग शांत करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या मदतीची अपेक्षा मित्र ठेवतील.
वृषभ :- विरोधक टीका करण्याचा प्रयत्न करतील. अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
मिथुनः- मनावरील ताण कमी होईल. मुलांच्या सहवासाने दु:ख कमी होईल. धंद्यासाठी प्रवास संभवतो.
कर्क :- आक्रमक पवित्रा घेऊ नका. तुमच्या मताशी इतरांची मते जुळणे कठीण होईल. कायद्याचे उल्लंघन करू नका.
सिंह :- मध्यस्थी करावी लागेल. तुमच्याबद्दल इतरांना आदर वाटेल. धंद्यासाठी भांडवल उभे करा
कन्या :- अपेक्षा वाढतील. शत्रूला तुमच्या सहकार्याची गरज निर्माण होईल. धंद्यात लाभ होईल.
तूळः- संततीच्या समस्येवर उपाय शोधता येईल. अडचणीवर मात करता येईल. प्रवास होईल.
वृश्चिकः- दुसर्याच्या मताचा मान ठेवा. तुमच्या कामातील अडचणी कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल.
धनु :- विचारांना चालना मिळेल. महत्त्वाची व अपेक्षित असलेली व्यक्ती भेटण्यात यश मिळवता येईल.
मकर :- तुमचे आकर्षण इतरांना वाटेल. मित्र-परिवार वाढेल. धंद्याला मदत मिळेल.
कुंभ :- वेळेवर ठरविलेली कामे पूर्ण करा. महत्त्वाच्या विषयावर चर्चा करा.
मीन :- दगदग होईल. राग वाढेल. तुमच्या मनाप्रमाणे काम होणे कठीण आहे.