राशीभविष्य: गुरुवार ०७ जुलै २०२२

horoscope

मेष : तुमच्या कार्याला दिशा मिळेल. काही लोक काड्या घालण्याचा प्रयत्न करतील. विरोधक मैत्री करतील.

वृषभ : कठीण कामे पूर्ण करा. नोकरीत बदल करण्याचा विचार करा. थकबाकी मिळवा. धंदा वाढेल.

मिथुन : अपरिचित व्यक्तीबरोबर व्यवहार करताना सावध रहा. स्पर्धेत जिंकण्यासाठी कष्ट घ्या.

कर्क : आजचे काम आजच करा. कठीण काम करून घ्या. कला-क्रीडा-साहित्यात चमकाल.

सिंह : महत्त्वाचा निर्णय घेता येईल. वाटाघाटीत यश मिळेल. प्रेमाची व्यक्ती भेटेल.

कन्या : ठरविलेले काम व्यवस्थित पूर्ण होईल. थकबाकी मिळवा. घर-जमीन खरेदी विक्री करा.

तुला : संयमाने वागा व बोला. मन उदास होईल. अपमानास्पद शब्द ऐकावे लागतील.

वृश्चिक : महत्त्वाची भेट घ्या. काम करण्याचा आळस करू नका. मागील येणे वसूल करा.

धनु : मनावर दडपण राहील. आप्तेष्ठ भेटतील. धंद्यात सुधारणा करण्याची संधी मिळेल.

मकर : जवळच्या व्यक्तींना खूश कराल. वास्तू, जमीन खरेदी-व्रिकीत फायदा होईल. मौज-मजा कराल.

कुंभ : कामाचा व्याप वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या. अनाठाई खर्च करावा लागेल. धंदा वाढेल.

मीन : तुम्ही ठरविलेले काम पूर्ण कराल. मुलांच्या सुखासाठी योजना बनवाल. धंदा वाढवाल.