राशीभविष्यः गुरुवार ०७ ऑक्टोबर २०२१

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष – शत्रुत्व वाढण्याची शक्यता आहे. राग अनावर होईल. अपमानास्पद शब्द ऐकावे लागतील. प्रवासात सावध रहा.

वृषभ – धंद्यातील अडचणी कमी होतील. नवीन परिचय होईल. काम मिळेल. मोठ्या लोकांची मदत घेता येईल.

मिथुन – कामाचा व्याप वाढला तरी वरिष्ठ खूश होतील. लाभ मिळेल. नवीन परिचय झाल्याने उत्साह वाढेल.

कर्क – मनाप्रमाणे घटना घडतील. पोटाचा त्रास संभवतो. खरेदी कराल. अचानक नोकरीत कामाचा बदल संभवतो.

सिंह – धंद्यात गोड बोलण्याचा फायदा होईल. प्रेमाला चालना मिळेल. पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल.

कन्या – मनाची द्विधा अवस्था होईल. विरुद्धलिंगी व्यक्तीमुळ्े समस्या निर्माण होऊ शकते. अरेरावी करू नका.

तूळ – व्यसनाचा त्रास होईल. मनाविरुद्ध एखादी घटना घडण्याची शक्यता आहे. धंद्यात लक्ष ठेवा हिशोब चुकेल.

वृश्चिक – नवीन विषयाचा अभ्यास कराल . विचारांना चालना मिळेल. थकबाकी वसूल करा. प्रवास कराल.

धनु – अपेक्षित व्यक्तीचा फोन येईल. नव्या विषयात रस घ्याल. वरिष्ठांच्या मदतीने कठीण कामातील समस्या कमी करा.

मकर – प्रकृतीत सुधारणा होईल. आत्मविश्वास वाढेल. कायद्याचे पालन करा. खर्च वाढेल. धंद्यात फायदा होईल.

कुंभ – उत्साहावर नियंत्रण ठेवा. मनावर एखादे दडपण येईल. प्रकृतीची काळजी घ्या. महत्वाची वस्तू जागेवर ठेवा. वेळ खर्च होईल.

मीन – व्यसनाने मनस्ताप व वाद संभवतो. विरुद्धलिंगी व्यक्तीच्या भानगडीत पडू नका. इतरांच्या वादात तुम्ही पडू नका.