घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य: गुरुवार ०९ फेब्रुवारी २०२३

राशीभविष्य: गुरुवार ०९ फेब्रुवारी २०२३

Subscribe

मेष ः- स्पष्ट बोलण्यापेक्षा काही गोष्टी युक्तीने सांगाव्या लागतात तरच त्या पटतात. प्रेमाने बोला. धंदा मिळवा.

वृषभ ः- अपरिचित व्यक्तीबरोबर कोणताही व्यवहार करताना काळजी घ्या. महत्त्वाचा फोन येईल.

- Advertisement -

मिथुन ः- आजचे काम ठरविल्याप्रमाणे होईल. सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. वरिष्ठांचा सहवास मिळेल.

कर्क ः- विरोधक मैत्री करण्यास तयार होतील. कठीण काम करून दाखवता येईल. धंद्यात वाढ होईल.

- Advertisement -

सिंह ः- मनस्ताप देणारा फोन येण्याची शक्यता आहे. पाहुण्यांसाठी जास्त काम करावे लागेल.

कन्या ः- आजचे काम उद्यावर टाकू नका. घरातील माणसांना प्रेमाने वागवा. वाटाघाटी कराव्या लागतील.

तूळ ः- आवडत्या विषयात मन रमेल. धंद्यात वाढ होईल. परिश्रम घ्या. प्रतिष्ठा मिळेल.

वृश्चिक ः- धंद्यासाठी केलेली धावपळ उपयोगी पडेल. ओळखीचा फायदा होईल. डोक्याने काम करा.

धनु ः- दगदग होईल. थकवा वाढेल. घरातील कामे करण्याचा विचार होईल. उद्या उत्साह वाढेल.

मकर ः- आजचे काम आजच करून घ्या. थकबाकी वसूल करा. धंद्यात नवा विचार करावा लागेल.

कुंभ ः- कारणाशिवाय कधी कधी डोक्याला त्रास होत असतो. फोन आल्याने मन विचलित होईल. संयम ठेवा.

मीन ः- आजच्या कामात चांगले यश मिळेल. उद्यावर जास्त विश्वा ठेवू नका. आज करायचे ते आत्ता करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -