मेष : तुम्हाला निष्कारण विरोध दर्शवला जाईल. तुमचा प्रभाव कमी होणार नाही. तुम्ही तुमचे धोरण सौम्यच ठेवा.
वृषभ : वादविवादात सरशी होईल. घरातील वाद चव्हाट्यावर आणू नका. प्रसंगानुरूप निर्णय बदलता येईल.
मिथुन : धंद्यात फायदा होईल. नवे मित्रमंडळ तयार करता येईल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.
कर्क : मन स्थिर ठेवा. कठीण प्रश्नावर तोडगा काढता येईल. थकबाकी वसूल करा. वरिष्ठांना दुखवू नका.
सिंह : तटस्थ भूमिका काही प्रश्नावर घ्या. नंतर विचार करून उत्तर द्या. प्रतिष्ठा राखता येईल. इतर लोक मदत करतील.
कन्या : महत्वाचे काम आज करण्याचा प्रयत्न करा. घरातील तणाव कमी होईल. प्रकृतीची काळजी घ्या. वाहन हळू चालवा.
तूळ : जीवनाला कलाटणी देणारी घटना घडेल. नोकरी मिळेल. जुना गैरसमज दूर करता येईल. पाहुणे येतील.
वृश्चिक : तुमचा अंदाज बरोबर आल्याने समस्या ओळखता येईल. विचारांना चालना मिळेल. स्पर्धेत पुढे जाल.
धनु : पैशाच्या व्यवहारात सावध रहा. पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल. शेजारी निष्कारण वाद निर्माण करतील.
मकर : घरगुती कामे होतील. जीवनसाथी, मुले यांना खूश कराल. प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. केस मिटवण्याचा विचार ठेवा.
कुंभ : तुमच्या प्रगतीवर टीका करणारे लोक वाढतील. संयम ठेवा. कायद्याचे पालन करून बोला व लिहा. तब्येत सांभाळा.
मीन : आज ठरविलेले काम उद्यावर टाकू नका. वसुली करा. धंद्यात काम मिळवण्यासाठी प्रयत्न करा. ओळखी होतील.