राशीभविष्य: गुरुवार १२ मे २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष :- सहनशीलता ठेवा. जबाबदारीने वागावे लागेल. तुमची महत्त्वाकांक्षा फोल ठरू शकते. राग आवरा.

वृषभ :- सकाळी महत्त्वाचे काम करून घ्या. धंद्यात लक्ष द्या. मोठे काम मिळेल. स्पर्धेत पुढे जाल.

मिथुन :- वरिष्ठांच्या मर्जीत रहाल. स्पर्धेत चमकाल. कोर्ट केस जिंकाल. थकबाकी वसूल करा.

कर्क :- तुमची प्रशंसा होईल. नवीन परिचय होईल. कला-क्रीडा-साहित्यात चमकाल.

सिंह :- ताण-तणाव सहन करावा लागेल. वाहन जपून चालवा. वाद वाढवू नका.

कन्या :- सकाळीच महत्त्वाचा निर्णय घ्या. काम करा. तुमचा अंदाज बरोबर येईल. धंदा मिळेल.

तूळ :- अपरिचित व्यक्तीसमोर कमीच बोला. धावपळ होऊ शकते. शेवटी तुमचे काम होईल.

वृश्चिक :- तुमच्या कामात इतरांची मदत होईल. प्रश्न सोपा करा. वाद वाढवू नका. यश खेचा.

धनु :- क्षुल्लक कारणाने मन उदास होईल. शेजारी तुमचा वेळ घेतील. वस्तू सांभाळा.

मकर :- मान-प्रतिष्ठा मिळेल. वाटाघाटीत यश मिळेल. मुलांची प्रगती पाहून समाधान मिळेल.

कुंभ :- जबाबदारीने वागणे कठीण वाटेल. तुमचा अंदाज बरोबर येईल. मैत्री वाढेल.

मीन :- धंद्यात जम बसेल. स्पर्धा जिंकाल. जुने काम करून घेता येईल. मदत मिळेल.