राशीभविष्य: गुरुवार १६ मार्च २०२३

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : कामातील अडचणी कमी होतील. आत्मविश्वासच महत्वाचा ठरेल. महत्वाची भेट करून घ्या.

वृषभ : धंद्यात अडचण येईल. धावपळ वाढेल. प्रवासात घाई करू नका. कोर्टाचे काम पूर्ण होईल.

मिथुन : घरातील व्यक्तीला नाराज करू नका. धंद्यात फायदा होईल. दिवस चांगला जाईल.

कर्क : कायदा मोडल्याचा आरोप होऊ शकतो. टीका होईल. पदाधिकार मिळेल.

सिंह : मुलांची प्रगती सुखावह वाटेल. वाटाघाटी यशस्वी होतील. कामात दगदग होईल.

कन्या : मान-प्रतिष्ठा मिळेल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. गोड बातमी मिळेल.

तूळ : आत्मविश्वास वाढेल. कठीण काम करून घेता येईल. प्रवासात घाई करू नका.

वृश्चिक : धंद्यात मोठे काम मिळेल. जास्त धोका पत्करू नका. कोर्टाचे काम लांबणीवर पडेल.

धनु : मनावर दडपण असले तरी कामे पूर्ण करता येतील. घरातील व्यक्तींचा सल्ला घ्या.

मकर : विरोध वाढेल. तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जाईल. कामात दगदग होईल.

कुंभ : प्रगतीची संधी तुमच्या क्षेत्रात मिळेल. धंद्यात फायदा होईल. कोर्टाच्या कामात विलंब होईल.

मीन : महत्वाची चर्चा करता येईल. पदाधिकार मिळेल. साहित्याला नवा विषय मिळेल.