राशीभविष्य: गुरुवार २१ जुलै २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : आनंदी रहाल. तुमच्या धोरणाला इतरांचा पाठिंबा जिद्दीने मिळवावा लागेल. विरोध सहन करता येईल.

वृषभ : कोर्टाच्या कामात योग्य व्यक्तीचा सल्ला घेता येईल. धंद्यात चालढकलपणा करू नका. सावध रहा.

मिथुन : मनावर दडपण येईल. भावना व कर्तव्य यांचा मेळ नीट घाला. किरकोळ दुखापत संभवते.

कर्क : उत्साहित रहाल. ईश्वरी चिंतन फायदेशीर ठरेल. कुलदेवीची प्रार्थना करा. निश्चयाने काम होईल.

सिंह : अरेरावी करण्यामुळे सामाजिक कार्यात वाद निर्माण होऊ शकतो. शेजार्‍याला मदत करावी लागेल.

कन्या : स्पर्धेत जिंकाल. नवीन ओळख उत्साह देणारी ठरेल. प्रेेमाला चालना मिळेल. धंद्यात लाभ होईल.

तुला : जिद्दीने सर्व कामे पूर्ण करावी लागतील. कुलदेवीची प्रार्थना उपयोगी पडेल. ओळखी होतील.

वृश्चिक : तुमच्या कार्याला योग्य वळण मिळेल. अडचण दूर करता येईल. योग्य ठिकाणी खर्च करा.

धनु : धंद्यात फायदेशीर योजना समोरून येऊ शकते. नातलगांचा सहवास मिळेल. प्रगतीकारक संधी येईल.

मकर : महत्त्वाची कामे होतील. दौर्‍यात यश मिळेल. लोकप्रियतेत वाढ होईल. देवीचा आशीर्वाद घ्या.

कुंभ : किरकोळ कारणाने राग वाढेल. प्रवासात अडचण येईल. कला-क्रीडा क्षेत्रात माघार घ्यावी लागेल.

मीन : ठरविलेला कार्यक्रम योग्य वेळेत पूर्ण करता येईल. ईश्वरी चिंतनाने मन प्रसन्न राहील.