राशीभविष्य : गुरुवार २९ डिसेंबर २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष :- धंद्यात लक्ष द्या. मोठे काम मिळवण्यात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठांच्या मतानुसार निर्णय घ्या.

वृषभ :- महत्त्वाचे काम करता येईल. घरातील तणाव कमी होईल. मैत्रीतील गैरसमज दूर होईल. स्पर्धेत पुढे जाल.

मिथुन :- प्रवासात घाई करू नका. घरात शुल्लक कारणाने वाद निर्माण होईल. प्रकृतीची काळजी घ्या. संयम ठेवा.

कर्क :- धंद्यातील नुकसान भरून काढण्याची संधी मिळेल. कल्पनाशक्तीला चालना मिळेल. कला क्षेत्रात मन रमेल.

सिंह :- उत्साह वाढेल. अधिकारी वर्गाचा दबाव तुमच्यावर राहील. कोर्टाच्या कामात मुद्याचेच बोला.

कन्या :- नवीन ओळख होईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. धंद्यातील खोट भरून काढता येईल. मन स्थिर राहील.

तूळ :- स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या. धावपळ होईल. नातलगांच्या मदतीला जावे लागेल. गैरसमज होईल.

वृश्चिक :-मनावरील ताण कमी होईल. मैत्रीत नव्याने वातावरण सुधारेल. घरातील कामे होतील. कला क्षेत्रात मन रमेल.

धनु :- खर्च वाढेल. घरगुती वाटाघाटीचा प्रश्न सोडवावा लागेल. आप्तेष्ठांची जबाबदारी तुमच्यावर येईल. नोकरीत कष्ट होतील.

मकर :- महत्वाचे काम करून घ्या. कला क्षेत्रात विशेष नावलौकिक मिळेल. मन उत्साहित होईल. मान प्रतिष्ठा मिळेल.

कुंभ :- किरकोळ कारणाने एखादा कार्यक्रम टाळावा लागेल. मन अस्थिर होईल. प्रवासात सावध रहा. दुखापत संभवते.

मीन :- धंद्यात फायदा होईल. आळसात वेळ घालवू नका. मोठे कंत्राट मिळवता येईल. नवे परिचय होतील. प्रभाव पडेल.