राशीभविष्य: गुरुवार ३० जून २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : महत्त्वाची कामे करून घ्या. घरातील व्यक्तीसाठी वेळ द्याल. खाण्याची काळजी घ्या.

वृषभ : धंदा वाढेल. तुमच्या प्रगतीचा विचार तुम्हाला करावा लागेल. कल्पनाशक्तीला वाव मिळेल.

मिथुन : मौज-मजा करण्याचा, नातलगांना भेटण्याचा बेत ठरवाल. मान-प्रतिष्ठा मिळेल.

कर्क : धंद्यात दगदग झाली तरी ओळख वाढेल. तुमच्या कार्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल.

सिंह : आज ठरविलेले काम आजच करा. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. वाटाघाटीत यश मिळेल.

कन्या : नोकरीत वरिष्ठांना दुखवून चालणार नाही. प्रवासात घाई करू नका. व्यवहारात सावध रहा.

तूळ : आजचे काम उद्यावर टाकू नका. भावनांना आवर घाला. धंद्यात लक्ष द्या.

वृश्चिक : ठरविलेले काम वेळच्या वेळी करा. धंदा वाढेल. महत्त्वाच्या कामासाठी प्रवास कराल.

धनु : आर्थिक लाभ होईल. जुने येणे वसूल करा. तुमचे बोलणे प्रभावी ठरेल.

मकर : लोकसंग्रह वाढवण्याचा प्रयत्न करा. जुने मित्र भेटतील. वाद मिटविण्याचा विचार होईल.

कुंभ : व्यवहारिक बोलणी यशस्वी होतील. नोकरीतील प्रश्न सुटेल. प्रतिष्ठा वाढेल.

मीन : प्रगतीची दिशा खुली होईल. गंभीरपणे विचार करा. विरोधक मैत्री करण्यासाठी येतील.