Homeभविष्यआजचे राशीभविष्यHoroscope : राशीभविष्य, गुरुवार १९ डिसेंबर २०२४

Horoscope : राशीभविष्य, गुरुवार १९ डिसेंबर २०२४

Subscribe

मेष – व्यवसायात नवे डावपेच योग्य पद्धतीने हाताळाल. नकारात्मक विचार करू नका. थकवा जाणवेल. मान-सन्मान प्राप्त होईल.
वृषभ – कौटुंबिक जीवनाचा आनंद घ्याल. लहान प्रवास करू शकाल. अध्यात्मात रमाल. जिभेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
मिथुन – मनाची खंबीरता सिद्ध करावी लागेल. आर्थिक प्रश्न सोडवण्यात यश मिळेल. आपल्या कल्पक योजनांचे कौतुक होईल.
कर्क – आकस्मिक खर्च होईल. नोकरीधंद्यात वरिष्ठांचे मार्गदर्शन आपल्यासाठी हितकारक ठरेल. आर्थिक व्यवहारात लाभ होईल.
सिंह – प्रयत्नवादाची साथच तारक ठरेल. आपल्या कार्याचे कौतुक मनास समाधान प्रदान करेल. पैशांच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवा.
कन्या – काम करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. मित्रांच्या भेटीगाठी होतील. आपल्या व्यावहारिक अडचणी सोडवण्यास प्राधान्य द्या.
तुळ – आपणास प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकणे शक्य होईल. भागीदाराची साथ मनास प्रेरणा देणारी ठरेल. विरोधक निष्प्रभ ठरतील.
वृश्चिक – आपल्या कामातील गुणवत्ता वाढवणे अगत्याचे आहे. वैवाहिक जीवनात समाधानाचे संकेत मिळतील. आनंदवार्ता समजतील.
धनु – आपल्या नोकरीधंद्यातील प्रयत्नांमध्ये कमी पडू नका. कुटुंबातील सदस्यांशी क्षुल्लक वाद संभवतात. आपली तब्येत सांभाळा.
मकर – मित्रपरिवाराकडून भेट मिळाल्याने दिवस आनंदात जाईल. आपल्या कौटुंबिक जबाबदारीस तत्परतेने न्याय द्या. कार्यक्षेत्रात सुयश मिळेल.
कुंभ – कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. विरोधकांचा विरोध मावळेल. आर्थिक बाजू सुधारेल. वरिष्ठांशी मिळते-जुळते धोरण स्वीकारावे.
मीन – सामाजिक क्षेत्रात गैरसमज होणार नाही याची दक्षता घ्या. नवीन वस्तूंचे खरेदीचे बेत साध्य होतील. काळजीपूर्वक गुंतवणूक करा.