राशीभविष्य: गुरुवार , १३ जानेवारी २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष :- तुम्ही ठरविलेला विचार, डावपेच कदाचित निष्फळ ठरण्याची शक्यता आहे. प्रकृतीकडे लक्ष द्या. धंदा सांभाळा.

वृषभ :- कोर्टकचेरीच्या कामात यश खेचता येईल. नवीन ओळख उपयुक्त ठरेल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल.

मिथुन :- धंद्यात फायदा होईल. स्पर्धेत मनावर दडपण येईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. सौम्य धोरण ठेवा.

कर्क :- मन चंचल होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढवता येईल. वरिष्ठांची मर्जी पाहून नवा विचार मांडता येईल.

सिंह :- चहुबाजूने जणू गळचेपी होत आहे असे वाटेल. दौर्‍यात सावध रहा. खाण्या-पिण्याचे तंत्र सांभाळा.

कन्या :- विचारांना चालना मिळेल. बाजूचा नाश करता येईल. धंद्यात वाढ होईल. कामगारांना दुखवू नका.

तूळ :- नियमितपणे तुमची कामे करण्याचा प्रयत्न करा. आप्तेष्ठांची भेट घडेल. खाण्यापिण्याची चैन कराल.

वृश्चिक :- महत्त्वाच्या कामाला वेळ लावू नका. ठरवाल ते करून दाखवता येईल. चर्चा सफल होईल.

धनु :- मुलांच्या बरोबर वादविवाद होईल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. अचानक कामाचा व्याप वाढेल. धावपळ होईल.

मकर :- घरगुती वातावरण मनासारखे राहील. अपेक्षित व्यक्ती भेटेल. अडचणीत आलेले काम पूर्ण करून घेता येईल.

कुंभ :- सत्य बोलणे सुद्धा सर्वांना आवडतेच असे नाही. तुम्हाला बोलताना वाईटपणा येऊ शकतो. खाण्याची काळजी घ्या.

मीन :- महत्त्वाचे काम झाल्याने आनंदी व्हाल. थकबाकी मिळेल. मान-प्रतिष्ठा वाढेल. पदाधिकार मिळू शकतो.