घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : गुरुवार ८ जुलै २०२१

राशीभविष्य : गुरुवार ८ जुलै २०२१

Subscribe

मेष : किरकोळ अडचणींमुळे तुमचे मन उदास होईल. मान मिळेल. नवीन ओळखी होतील. खर्च वाढेल. धंदा मिळवा.

वृषभ : आजचे काम उद्यासाठी ठेऊ नका. तुमची कलात्मकता सर्वांच्या नजरेत भरेल. नवीन कामे मिळतील.

- Advertisement -

मिथुन ः घरातील तणाव कमी होईल. नोकरीत वरिष्ठांच्या शब्दाला मानावे लागेल. मैत्रीत व्यवहार कराल.

कर्क : कोर्ट केस जिंकाल. कला क्षेत्रात मन रमेल. विशेष यश तुमच्या क्षेत्रात मिळवाल. येणे वसूल करा.

- Advertisement -

सिंह : व्यसनात वाहवत जाऊ नका. विरुद्धलिंगी व्यक्तीचा प्रभाव तुमच्यावर पडेल. जपून मैत्री करा. सौम्य रहा.

कन्या ःमहत्त्वाचे काम आज करून घ्या. जुने मित्र भेटतील. मौज-मजेत वेळ खर्च होईल. वरिष्ठ खूश होतील.

तूळ : तुमची धावपळ होईल. अपरिचित व्यक्तीवर जास्त विश्वास ठेऊ नका. महत्त्वाची वस्तू वेळच्या वेळी जागेवर ठेवा.

वृश्चिक : आज काम करण्याचा आळस करू नका. उद्या कामे वाढण्याची शक्यता आहे. तुमचे वर्चस्व राहील.

धनु : कठोर बोलणे टाळल्यास तुमचा प्रभाव अधिक वाढेल. जुना वाद मिटवता येईल. नवीन ओळखी होतील.

मकर : किचकट काम करून घेता येईल. मान-प्रतिष्ठा मिळेल. स्पर्धा जिंकाल. नोकरीत कौतुक होईल.

कुंभ : नोकरीत कामाचा व्याप वाढेल. वरिष्ठ तुमच्यावर नवीन जबाबदारी देतील. स्पर्धा नाही.

मीन : तुमच्या कामाला गती मिळेल. कलाक्षेत्रात प्रगती कराल. कल्पना कृतीत उतरवता येईल. धंदा वाढेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -