मेष : आत्मविश्वासाने तुम्ही विचार मांडा. पटले तर ठीकच. नाहीतर गप्प बसा. समोरची व्यक्ती स्वतःहून येऊ शकते.
वृषभ : धंद्यात चांगले काम मिळेल. मान-प्रतिष्ठा वाढेल. वसुली करा. घर, वाहन घेण्याचे ठरवाल.
मिथुन : प्रेमाला चालना मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नवीन सहवास मिळेल.
कर्क : मनाविरुद्ध घटना घडेल. जास्त तापू नका. मनस्ताप होईल. कायदा मोडू नका.
सिंह : महत्त्वाची कामे करता येतील. कायद्यासंबंधी कामे करा. धंद्यात वाढ होईल. जमीन घ्या.
कन्या : तुमच्या मताला इतरांचा पाठिंबा मिळेल. मुलांना समजून घेता येईल. स्पर्धा जिंकाल.
तूळ : तुमच्या क्षेत्रात महत्त्वाची चांगली घटना घडेल. नोकरीत फायदेशीर बदल करण्याची संधी मिळेल.
वृश्चिक : महत्त्वाच्या वस्तू नीट सांभाळा. वाद वाढवू नका. शेअर्सचा अंदाज घाईत घेऊ नका. प्रसंगावधान ठेवा.
धनु : घरात शुभ समाचार मिळेल. अधिकार प्राप्ती होईल. नोकरीत वर्चस्व दिसेल. धंदा वाढेल.
मकर : तटस्थपणे प्रसंगाचे निरीक्षण करा. कमी बोला. अपमानस्पद शब्द ऐकावे लागतील.
कुंभ : कुटुंबात एक वाक्यता होईल. मौज-मजेत वेळ जाईल. नव्या दिशेने धंद्याचा विचार कराल. पद मिळेल
मीन : स्पर्धेत जिंकाल. पदाधिकार मिळेल. नवीन ओळख होईल. वसुली करा.