राशीभविष्य: गुरुवार २६ मे २०२२

Weekly Horoscope Future Sunday 12th June to Saturday 18th June 2022
राशीभविष्य

मेष : सकाळीच महत्त्वाचे काम करा. निर्णय घ्या. पाहुणे येतील. खर्च वाढेल. प्रेमाला चालना मिळेल.

वृषभ : शेजारी तुमच्या कामात अडचण निर्माण करेल. प्रवासात घाई नको. कायद्याचे पालन करा.

मिथुन : विचारांना प्रेरणा देणारी घटना घडेल. स्पर्धा जिंकाल. नोकरीत बदल करण्याचा विचार कराल.

कर्क : मान-प्रतिष्ठा वाढेल. घरातील व्यक्ती तुमचे कौतुक करतील. आवडते पदार्थ सेवन कराल.

सिंह : आत्मविश्वासाने वागाल. मान-अपमान करत न राहता स्वतःचे कर्तव्य करा. कार्य करा.

कन्या : धंद्यात वाढ होईल. कठीण काम करून घ्या. कोर्टाच्या कामात यश मिळेल. ओळख होईल.

तुला : तुमचा अंदाज बरोबर येईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. नोकरी मिळेल. कोर्ट केस जिंकाल.

वृश्चिक : सकाळचा उदासपणा दुपारनंतर कमी होईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल.

धनु : महत्त्वाचे काम सकाळीच करा. संयमाने निर्णय घ्या. मनस्ताप होण्याची शक्यता आहे.

मकर : राजकारणात महत्त्वाची वाटाघाटी आज करून घ्या. मौल्यवान खरेदी कराल. आनंदी रहाल.

कुंभ : कठीण कामाला पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जवळच्या लोकांना दिलेला सल्ला उपयुक्त होईल.

मीन : दुपारनंतर तुमचे डोके शांत होईल. धंद्यात लक्ष द्या. सयम ठेवा. वाहन जपून चालवा.