घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : गुरुवार १६ नोव्हेंबर २०२३

राशीभविष्य : गुरुवार १६ नोव्हेंबर २०२३

Subscribe

मेष : धावपळ वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या. राजकीय क्षेत्रात तुम्हाला कमी लेखण्याचा निष्फळ प्रयत्न केला जाईल. शांत रहा.

वृषभ : घरातील तणाव कमी करता येईल. मानसिक शांतता लाभेल. धंद्यात खर्च होईल. महत्त्वाच्या वस्तू वेळच्या वेळी जागेवर ठेवा.

- Advertisement -

मिथुन ः प्रवासात घाई करू नका. धंद्यात संयमाने वागा. नवीन विषयाचा अभ्यास कराल. विरोध सहन करावा लागेल.

कर्क : घरातील व्यक्तीची मदत मिळेल. लोकांच्या मनातील गैरसमज दूर करता येईल. नोकरीचा प्रयत्न करा. वसुली करा.

- Advertisement -

सिंह : तुमच्यावर निष्कारण आरोप होईल. टीकात्मक चर्चा होईल. धावपळ होईल. वरिष्ठ व्यक्तीचा सल्ला मानावा लागेल.

कन्या ः धंद्यात नरमाईने वागा. बोला. काम होईल. पोटाची काळजी घ्या. आप्तेष्ठांना मदत करावी लागेल. कमी बोला.

तूळ ः धंद्यात वाढ होईल. तुमच्या कार्याशी स्पर्धा करणारे लोक वाढतील. नवीन ओळख होईल. पाहुणे येतील.

वृश्चिक ः तुमच्या कार्याला योग्य दिशा मिळेल. शेजारी मदत मागण्यास येईल. महत्त्वाची वस्तू वेळच्या वेळी जागेवर ठेवा. धंदा मिळेल.

धनु ः- काम रेंगाळण्याची शक्यता आहे. धंद्यात वाढ करण्याचा प्रयत्न करा. मुलांच्यासाठी वेळ द्यावा लागेल. पाहुणे येतील.

मकर ः- सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. लोकांच्यासाठी महत्त्वाची कामे करता येतील. धंद्यात आळस करू नका. वसुली करा.

कुंभ ः- नोकरीसाठी नवा प्रयत्न करा. ओळखी वाढतील. स्पर्धेत चमकाल. धंद्यात सुधारणा करण्याचा विचार करा.

मीन ः- रेंगाळत राहिलेले काम करून घेता येईल. वसुली करा. नवीन ओळखीमुळे उत्साह वाढेल. कल्पनाशक्ती वाढेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -