राशीभविष्यः गुरुवार १८ नोव्हेंबर २०२१

Horoscope
राशीभविष्य

मेष :- दुसर्‍याला दोन शब्द ऐकवता येतील व ऐकून घ्यावे पण लागतील. तटस्थ भूमिका घेण्याचा विचार सोडून द्यावा लागेल.

वृषभ :- उत्साहाच्या भरात मोठे काम करून दाखवता येईल. यश मिळेल. खर्चाला सामोरे जावे लागेल.

मिथुन :- दुसर्‍याला दोष देण्यापेक्षा स्वतःचे आत्मपरीक्षण करा. तुमच्या विरोधात निकाल लागण्याची शक्यता आहे.

कर्क :- अपेक्षा वाढत जातील. मनाप्रमाणे काम करता येईल. नवीन परिचय करून घ्याल.

सिंह :- कौटुंबिक वाटाघाटीची मागणी इतर स्वकीय करतील. स्पष्ट व सडेतोड उत्तर द्याल. क्षेत्रात तत्परता दाखवाल.

कन्या :- सामाजिक कार्यात मन रमेल. कलावंत, खेळाडू यांना यशस्वी दिवस राहील. लाभदायक घटना संभवते.

तूळ :- प्रकृती नरम-गरम राहील. उत्साहाच्या भरात दुसर्‍याला एखादे आश्वासन देऊन जाल.

वृश्चिक :- नवीन घटना अनुभवास येईल. घरगुती वातावरण आनंदी राहील. जुना वाद मिटवता येईल.

धनु :- रबर जास्त ताणले तर तुटते. नाते टिकविणे फार कठीण असते. वरवर गोड बोलून तुम्ही संसार टिकवू शकत नाही.

मकर :- दिलेला शब्द पाळणे तुम्हाला फारच महत्त्वाचे वाटते. कठीण परिस्थितीमधून मार्ग शोधून काढाल.

कुंभ :- भावनाविवश व्हाल. कोर्ट केसमध्ये लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. संधी शोधावी लागेल.

मीन :- मैत्री टिकवण्याची तुमची कला फारच कौतुकास्पद ठरेल. खर्चाचा विचार न करता तुम्ही काम करून टाकाल.