मेष – नोकरीच्या ठिकाणी आनंदाचे वातावरण असेल. गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या. घरातील कामे वाढतील.
वृषभ – सामाजिक कामात आपण अधिक सक्रिय व्हाल. रागाच्या भरात वादविवाद होऊ शकतात. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
मिथुन – वृद्ध व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकते. आपल्या हातून दुसर्यांचं चांगलं काम होईल. वरिष्ठ कामाची प्रशंसा करतील.
कर्क – व्यावसायिक क्षेत्रात क्षुल्लक अडचणी जाणवतील. वाटाघाटीत यश मिळेल. कल्पनाशक्तीला चालना मिळेल. वसुली कराल.
सिंह – मान मिळेल. कामात उत्साह वाटेल. वरिष्ठांच्या बरोबरीने काम करावे लागेल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
कन्या – महत्त्वाचे काम रेंगाळण्याची शक्यता आहे. मित्रांसमवेत मौजमजा कराल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.
तूळ – कला क्षेत्रात रमाल. सार्वजनिक ठिकाणी अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. प्रिय व्यक्तींची भेट आनंद देईल.
वृश्चिक – किरकोळ कारणाने तुमचा उत्साह कमी होऊ शकतो. महत्त्वाचे काम करता येईल. एखादा निर्णय घेण्यास वेळ लागेल.
धनु – थट्टा-मस्करी करताना सावध राहा. प्रवासाची संधी मिळेल. सामाजिक जीवनात मान-सन्मान मिळेल. नवीन खरेदी कराल.
मकर – महत्त्वाचे काम करून घ्या. विचारांना चालना मिळेल. विरोधक किरकोळ अडचण निर्माण करतील. इतरांना मदत कराल.
कुंभ – नोकरीत चुकीचे काम करू नका. नियोजित काम पूर्ण झाल्यामुळे उत्साह वाढेल. आपल्या जोडीदाराचा हट्ट पुरवाल.
मीन – आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. कुठलीही चर्चा संयमाने करा.
Horoscope : गुरुवार 28 नोव्हेंबर 2024
written By My Mahanagar Team
Mumbai
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -