घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्यः मंगळवार, ०५ एप्रिल २०२२

राशीभविष्यः मंगळवार, ०५ एप्रिल २०२२

Subscribe

मेष :- घरातील व्यक्तींचा सल्ला उपयोगी पडेल. प्रेमाची माणसे मदत करतील. प्रतिष्ठा मिळेल.

वृषभ :- वादविवाद वाढू देऊ नका. प्रवासात सावध रहा. वाहनाचा वेग कमी ठेवा. रागावर ताबा ठेवा.

- Advertisement -

मिथुन :- तुमचा प्रश्न वरिष्ठ सोडवतील. जुने मित्र मदत मागण्यास येतील. स्पर्धेत जिंकाल.

कर्क :- तुमची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होईल. राग वाढू देऊ नका. प्रवासात सावध रहा. गोड बोलून कामे करा.

- Advertisement -

सिंह :- तुमच्या विचारांना सर्वांची सहमती मिळेल. तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. मित्र मदत करतील.

कन्या :- घर, जमीन घेण्याचा विचार पूर्ण करता येईल. शोध घ्या. धंद्यात फायदा होईल.

तूळ :- कल्पनाशक्तीला चालना मिळेल. नवीन ओळख होईल. कला-क्रीडा-साहित्यात प्रगती होईल.

वृश्चिक :- अधिकाराची भाषा कुठेही करू नका. नम्रपणे तुमचा मुद्दा मांडा तरच तुमचा प्रभाव राहील.

धनु :- कठीण काम करून घ्या. प्रतिष्ठा मिळेल. मदत करणार्‍यांना दुखवू नका. फायदा करून घ्या.

मकर :- तुमच्यावर काही लोक निष्कारण रोष ठेवतील. घरातील लोकांचे सहकार्य मिळेल. धंद्यात लक्ष द्या.

कुंभ :- दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. घरात शुभ कार्याचे ठरेल. परीक्षेत चांगली प्रगती करता येईल.

मीन :- धावपळ जास्त होईल. रस्त्याने सावधपणे चाला. महत्त्वाची कागदपत्र सांभाळा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -