राशीभविष्य: मंगळवार ०५ जुलै २०२१

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : धंद्यात सुधारणा करता येईल. जवळच्या लोकांना समजून घ्या. तुमचे मत नीट समजून घ्या.

वृषभ : दुपारच्या चहानंतर तुमच्या समस्येवर उपाय शोधता येईल. शेजारी मदत करतील.

मिथुन : सकाळचे काम सकाळीच करण्याचा प्रयत्न करा. धंद्यात चांगला फायदा होईल. मित्र भेटेल.

कर्क : तुम्ही घेतलेले परिश्रम फायदेशीर ठरतील. खरेदी-विक्रीत फायदा होईल. प्रगती होईल.

सिंह : महत्त्वाची चर्चा यशस्वी होईल. थकबाकी वसूल करा. स्पर्धेत चमकाल. ओळख होईल.

कन्या : सकाळचा ताणतणाव दुपारनंतर कमी होईल. धंद्यातील गुंता सोडवता येईल. प्रसिद्धी मिळेल.

तूळ : सकाळीच महत्त्वाचा निर्णय घेता येईल. संध्याकाळी कामात अडचणी येतील. दडपण येईल.

वृश्चिक : आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा वाटेल. नवीन ओळख व्यवसायाच्या संबंधी होऊ शकते.

धनु : सकाळची कामे वेगाने पूर्ण होतील. किरकोळ विलंब भेटी घेण्यास होऊ शकतो.

मकर : तुमच्या कार्याला वेग प्राप्त होईल. जुने येणे वसूल करा. धंद्यात फायदा होईल.

कुंभ : धावपळ दुसर्‍याच्या कामासाठी करावी लागेल. नको असलेल्या व्यक्तीसाठी पैसा व वेळ खर्च होईल.

मीन : प्रत्येक काम योग्य पद्धतीने पूर्ण होऊ शकेल. घरात आनंदी वातावरण राहील. धंदा वाढेल.