राशीभविष्य मंगळवार ०५ ऑक्टोबर २०२१

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष :- आपलेपणाची भावना निर्माण झाली म्हणजे प्रेम तयार होते, आपुलकी वाढते. आर्थिक लाभ होईल.

वृषभ :- जमिनीचा व्यवहार होण्याची शक्यता आहे. अडचणी कमी होतील. तुमचे मत विचारले जाईल.

मिथुन :- नोकरीत चांगला जम बसेल. नवीन धंद्याचे जमून येईल. वरिष्ठांचा सल्ला उपयोगी पडेल. प्रेमात यश मिळेल.

कर्क :- जुने येणे वसूल करता येईल. आप्तेष्ठांची भेट होईल. नवीन वस्तू खरेदी कराल.

सिंह :- प्रसिद्धीचा योग येईल. तुमच्याबद्दल झालेले गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. मैत्री वाढेल.

कन्या :- मनातल्या मनात धडपड होईल. कठोर शब्द प्रयोग केल्यास त्रासदायक गोष्टी घडतील.

तूळ :- नवीन कामाची संधी मिळेल. ठरविलेला कार्यक्रम वेळेत पूर्ण होतील. पैशाची अडचण दूर होईल.

वृश्चिक :- तुमची अपेक्षा पूर्ण होईल. भेटी-गाठीत यश मिळेल. खरेदी करण्याचा मूड येईल.

धनु :- कार्यक्रमाची योग्य ती आखणी करता येईल. खाण्यापिण्याची चंगळ होईल. नवीन परिचय उत्साह देतील.

मकर :- दगदग, धावपळ होईल तरीही मन आनंदी राहील. महत्वाचा निर्णय घ्यावा लागेल. मैत्री करण्यात यश येईल.

कुंभ :- कुटुंबातील व्यक्तीची भेट होईल. खूशखबर मिळेल. जागेचा प्रश्न सोडवता येईल. वेळ फुकट जाऊ शकतो.

मीन :- तुमच्या कार्याचा वेग पाहून विरोधक मनातून धास्तावतील. तुमचे डावपेच इतक्यात उघड करण्याची गरज नाही.