मेष – आवडत्या माणसांसोबत वेळ चांगला जाईल. प्रकृतीची काळजी घ्यावी. व्यवहारात हिशोब नीट करा. महत्त्वाच्या वस्तू सांभाळा.
वृषभ – नोकरीत सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल. तुम्हाला कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत यश मिळेल. कल्पनाशक्तीला चालना मिळेल.
मिथुन – राजकारणाच्या क्षेत्रातील प्रयत्नांना अपेक्षित यश मिळेल. सुख शांतीचा अनुभव घ्याल. सर्वांची मर्जी राखणे सोपे नसेल.
कर्क – प्रिय व्यक्तीची भेट झाल्याने मन प्रसन्न होईल. सांस्कृतिक कामात सहभागी होण्याची संधी मिळेल. आपले विरोधक शांत होतील.
सिंह – नोकरीत नम्रपणे बोला. आरोग्याच्या बाबतीत अडचण येऊ शकते. कार्यक्षेत्रातील प्रयत्नांना यश मिळेल. नवीन ओळख होईल.
कन्या – बिघडलेली कामे पूर्ण होतील. कर्ज प्रकरणात यश मिळेल. नोकरी, घरातील समस्या सोडवता येतील. उपयोगी खरेदी कराल.
तूळ – कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये आनंद असेल. साहित्यात प्रगती कराल. महत्त्वाचा निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला उपयोगी पडेल.
वृश्चिक – मुलांप्रतिच्या जबाबदारीची पूर्तता होईल. महत्त्वाचे काम करून घ्या. कामात क्षुल्लक अडचण येऊ शकते. येणे वसूल करा.
धनु – आत्मविश्वासात वाढ होईल. धंद्यात योग्य निर्णय घेतला येईल. धरसोड वृत्ती ठेवू नका. एखादे जुने अडकलेले काम पूर्ण होईल.
मकर – सरकारी कामात अपेक्षित यश मिळेल. नावडत्या व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे. आपल्या विचारांना चालना मिळेल.
कुंभ – मुलांशी संबंधित एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो. धार्मिक कार्यात खर्च होऊ शकतो. कोर्टकेसमध्ये सौम्यपणे बोला.
मीन – नोकरीत आपले वर्चस्व राहील. कुणाच्या नुकसानीस कारणीभूत होऊ नका. मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळेल.
Horoscope : मंगळवार 10 डिसेंबर 2024
written By My Mahanagar Team
Mumbai